जिल्ह्यात 163 बाधित
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा गतवर्षी सारखी स्थिती निर्माण केली आहे. मागील चार महिन्यानंतर शुक्रवार (दि.12) पुन्हा 163 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले. गुरुवारी सुदैवाने मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
जिल्ह्यात शुक्रवार 1717 संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या यात 154 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर 163 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये सर्वाधिक 100 रुग्ण बीड तालुक्यात निष्पन्न झाले. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 4,धारुर 1, गेवराई 9, केज 1, माजलगाव 8, परळी 7, पाटोदा 2, शिरुर 3, वडवणी 1 असा रुग्णांचा समावेश आहे. तसेच गुरुवारी 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता एकूण बाधितांचा आकडे 19 हजार 986 इतका झाला असून पैकी 18 हजार 679 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 588 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग पुन्हा एकदा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनासंबंधीचे निर्बंध कडक केले जात आहेत. सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत, यात्रा तसेच मंदिरेही बंद ठेवण्यात आली. असे असले तरी जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गुरुवारी तरी जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी आकडेवारी समोर आली. बर्याच कालावधीनंतर बाधितांचा आकडा वेगाने वाढल्याने जिल्हाभरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी आतातरी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे झाले आहे.
Leave a comment