बीड | वार्ताहर
कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बुधवारपासून बीड शहरातील व्यापार्यांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. बुधवारी 495 जणांच्या अॅन्टीजेनमध्ये 9 व्यापार्यांचे रिपोर्ट कोरोनाबाधित निष्पन्न झाले होते. त्यानंतर आज तपासणीच्या दुसर्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.11) दुपारी 2 वाजेपर्यंत 403 व्यापार्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी ही माहिती दिली.
शहरातील कोव्हीड केअर सेंटर आयटीआय येथे 103 जणांची कोरोना चाचणी झाली. यात तीन व्यापार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जि.प.प्राथमिक शाळा अशोकनगर येथे 29 व्यापार्यांची तपासणी झाली. यात 1 एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. राजस्थानी विद्यालयात 150 जणांची तपासणी झाली. याठिकाणी दुपारपर्यंत एकही बाधित रुग्ण निष्पन्न झाला नाही. तसेच चंपावती प्राथमिक विद्यालयात 121 जणांची तपासणी झाली. यात 2 व्यापार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
Leave a comment