माजलगाव । वार्ताहर

तालुक्यासह मराठवाड्या ’परिवर्तन’ मल्टीस्टे व पतसंस्था मार्फत गोरगरिबांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा परिवर्तन घोटाळ्याचा  म्होरक्या असलेला विजय उ़र्फ भारत आलझेंडे अखेर मंगळवारी माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. परिवर्तन गैरव्यवहारात 11 गुन्हे दाखल असुन विजय अलझेंडे व अनेक संचालक 3  वर्षांपासून फरार आहेत.
येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थाचा चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे याने मल्टीस्टेटच्या 13 शाखा सुरु केल्या होत्या. तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या. यात मोठा अपहारकरून मागील तीन वर्षांपासून अलझेंडे फरार होता. मंगळवारी दुपारी 4 वाजता येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात तो स्वतः शरण आला. अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वाघमारे यांनी अलझेंडेची 23 तारखेपर्यंत जिल्हा तुरूंगात रवानगी केली. परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा अपहार झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले होते. अनेकांच्या जमापुंजी बुडाली तर अनेकांच्या मुलीची लग्न मोडली होती. अलझेंडे न्यायालयाला शरण आल्याने ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.    

 

 दोन फरार संचालकही ताब्यात

परिवर्तन पतसंस्थेच्या दोन फरार संचालकांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मंगळवारी (दि.9) यश आले. संजय बाबूलाल शर्मा, बालाजी मधुकर पानपट अशी त्यांची नावे आहेत. शर्माला औरंगाबादेतून तर पानपटला माजलगवातून ताब्यात घेतले. त्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी ’परिवर्तन’ व ’शुभकल्याण’च्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची पथके नेमली आहेत. पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत, मनोज वाघ, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे व खेडकर यांच्या पथकाने दोन फरार संचालकांना अटक केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.