बीड | वार्ताहर
जिल्ह्यात मंगळवारी (दि.9) कोरानाचे 93 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 55 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मंगळवारी जिल्ह्यातील 790 संशयित नागरिकांच्या सोमवारी कोरोना चाचण्या करण्यात आल्या.यातील 697 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 93 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 43, अंबाजोगाई 22,
आष्टी, शिरुर व पाटोदा तालुक्यात प्रत्येकी 2, माजलगाव 11, केज 4, गेवराई 5 तसेच परळी व धारुर तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या 19 हजार 528 इतकी झाली आहे. पैकी 18 हजार 490 जण कोरोनामुक्त
झाले असून 588 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.



Leave a comment