जिल्ह्यात आज 80 नवे रुग्ण
बीड | वार्ताहर
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण राज्यात काही भागात वाढत आहेत. तसेच मागील आठवडाभरापासून मराठवाड्यातही रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. यात बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्याही कमी अधिक होत आहे. आज बुधवारी (दि.3) जिल्ह्यात तब्बल 80 नवे कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. महत्वाचे हे की, यातील तब्बल 37 रुग्ण बीड तालुक्यातील आहेत. त्यामुळे बीड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात बुधवारी 1045 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 965 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 80 बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 37,अंबाजोगाई 15, आष्टी 8, धारुर 3, गेवराई 2, केज 2, माजलगाव 5, परळी 6 तसेच शिरुर व वडवणी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 18 हजार 964 इतका झाला असून यापैकी 17 हजार 973 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 579 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार व डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Leave a comment