प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाला तक्रार
बीड । वार्ताहर
एचपीएम कंपनीच्या रखडलेल्या कामाविषयी आणि निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बीड व जिल्हाधिका-यांनी उपविभागीय आधिकारी यांना लेखी आदेश दिल्यानंतर एचपीएम कंपनीचे व्यवस्थापक शिंदे यांनी रखडलेले काम तात्काळ करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा सुधारणा होतच नाही ,त्यामुळेच 15 दिवसापुर्वी खुला केलेला नाल्यावरील पुल साधे रिकामे टीप्पर वाहन जाताच कोसळला असून याप्रकरणात एचपीएम कंपनीच्या सर्वच कामांची गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
एचपीएम कंपनी द्वारा करण्यात येणारे काम 3-4 वर्षापासून रखडलेले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असून या कामासंदर्भात विविध संघटनांनी तक्रारी तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेली आहेत, कित्येक जण अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत, परंतु एचपीएम कंपनीच्या कामात सुधारणा होताना दिसत नाही.न्यायालय, रेस्ट हाऊस समोरील कामाला तडे गेलेले आहेत, काही ठीकाणी एक महिन्यापुर्वी केलेले बांधकाम निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच केज-बीड रस्त्यावरील हिरो शो रूमच्या बाजुने उमरी रोड कडील वसाहतीकडे जाणारा नालीवरील पुल काल दि.1 मार्च 2021 रोजी मोकळे टीप्पर जात असताना नालीवरील स्लॅब कोसळून टीप्पर नालीत कोसळले, त्यामुळेच एचपीएम कंपनी मार्फत सुरू असलेल्या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी करण्यात यावी.अशी लेखी तक्रार केली आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, शिंदे, कंपनी व्यावस्थापकाने लेखी देऊनसुद्धा कामात सुधारणा नाहीच: डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.28/12/2020 रोजी वरील रखडलेल्या व निकृष्ट रस्त्याप्रकरणात रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर दि.09/12/2020 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी बीड यांना कारवाईचे आदेश दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय आधिकारी बीड यांना संबधित प्रकरणात चौकशी व कारवाईचे आदेश दिले होते, त्यानंतर रास्ता रोको करू नये म्हणून दि.28/12/2020 रोजी निवृत्ती शिंदे कंपनी व्यावस्थापक यांनी तातडीने व दर्जेदार काम करण्याचे लेखी आश्वासन दिले, परंतु नुकत्याच नालीवरील पडलेल्या पुलामुळे त्यांचे निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे, त्यामुळेच एचपीएम कंपनीच्या सर्वच कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Leave a comment