बीड । वार्ताहर
जिल्ह्यात सोमवारी कोरानाचे नवे 52 रुग्ण निष्पन्न झाले तर 48 कोरोनामुक्त झाले. सुदैवाने मृत्यूची नोंद झाली नाही.
सोमवारी जिल्ह्यातील 794 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 742 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 52 बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये 13, आष्टी 2, बीड 17, गेवराई 3, केज 4, माजलगाव 8, परळी 1, पाटोदा 2 आणि शिरुर कासार तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या 18 हजार 835 इतकी झाली असून यापैकी 17 हजार 914 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 578 जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार व डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
मृत्यूदर घटला
बीड जिल्ह्यात मागील दोन महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला होता,मात्र आता राज्यभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळू लागल्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. असे असले तरी बीड जिल्ह्याचा मृत्यू दर मात्र आता 10 पूर्णांकांनी घटला आहे. गत दिड महिन्यापूर्वी जिल्ह्याचा मृत्यूदर 3.17 टक्क्यांवर पोहचला होता. आताचा मृत्यूदरात घट होवून 3.6 टक्के इतका आहे.
Leave a comment