मंत्रीच करू लागले महिलांवर अत्याचार-राजेंद्र मस्के

बीड । वार्ताहर

सध्या संपूर्ण राज्यामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाला अवाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मयत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.27) मंत्री संजय राठोड यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

याप्रसंगी राजेंद्र मस्के म्हणाले कि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी सर्वात अगोदर माझ्या जिल्ह्यातील मयत पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूची चौकशी होऊन पुजाला न्याय मिळाला पाहिजे अश्या भावना व्यक्त केल्या होत्या.परंतु दुर्दैवाने वीस दिवस होऊनही अद्याप याप्रकरणात साधा गुन्हा देखील नोंद झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राजरोसपणे महिलांवर अन्याय अत्याचार करतील व मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असतील तर महिला सुरक्षा व सन्मान डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टी कदापि अन्याय सहन करणार नाही. यावेळी भाजपाचे नगरसेवक जगदीश गुरखुदे,किरण बांगर,डॉ.लक्ष्मण जाधव,शांतीनाथ डोरले,डॉ.जयश्रीताई मुंडे,लताताई बुंदेले, अनिता जाधव,भूषण पवार,बालाजी पवार,हरीष खाडे,नागेश पवार,कपिल सौदा,दत्ता परळकर,विलास बामणे,अमोल वडतिले,विलास सातपुते,कल्याण पवार,शाम कोटुळे,बाळासाहेब घोलप,गणेश तोडेकर,बद्रीनाथ जटाळ,महेश सावंत,शरद बडगे,प्रल्हाद चित्रे,स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.