केज पंचायत समितीच्या लेट-लतिफ कर्मचार्यांना
आवर घालण्याचे गटविकास अधिकार्यांपुढे मोठे आवाहन
केज ! प्रतिनिधी
केज पंचायत समिती मागील काही दिवसांपासून रोहयो भ्रष्टाचार प्रकरणी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या रडारवर आहे.तर केज पंचायत समितीतील कर्मचार्यांना आवर घालण्याचे मोठे आव्हान केजच्या गटविकास अधिकार्यांपुढे झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. शुक्रवार दु.5 वा.येथे फक्त 10 ते 12 कर्मचारी कार्यरत होते.दरम्यान दुपारीच गायब झालेले साह्यक लेखाधिकारी रवि भोसले यांच्या खुर्चीला हार घालून अशोक भोसले,श्रीराम तांदळे यांनी गांधीगिरी आंदोलन केले आहे.
केज पंचायत समितीत एकूण 56 कर्मचारी आसून त्यातील 15 ते 17 कर्मचारी हजर असतात तर 35 कर्मचारी दांडीयात्रेवर असतात शुक्रवारी दु.5 वाजताची परिस्थिती अशी होती की केज पंचायत समितीत 8 ते 9 कर्मचारी उपस्थित होते तर काही कर्मचार्यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्या आहेत परंतू ते उपस्थित नव्हते तर काही कर्मचारी सकाळपासूनच गायब होते.त्यामुळे काही कामानिमित्त आलेल्या नागरीकांना चकरा मारण्याची वेळ येत आहे. प्रत्यक्षात एका गरीब लाभार्थ्यांचे अश्रु ढाळले होते.त्यानंतर 4:30 वा युवा नेते श्रीराम तांदळे व पत्रकार अशोक भोसले गेल्यानंतर साह्यक लेखाधिकारी रवि भोसले दुपारीच गायब झाले होते ते आष्टी ते पाटोदा दरम्यान प्रवास करत असल्याची माहिती मिळाली यानंतर संतप्त युवा नेते श्रीराम तांदळे व पत्रकार अशोक भोसले यांनी दांडीयात्रेवर असलेल्या कर्मचार्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले आहे तर गटविकास अधिकार्यांना लेट-लतिफ कर्मचार्यांना आवर घालण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे.याबाबत सहाय्यक लेखाधिकारी रवि भोसले म्हणाले,माझ्याकडे की घेण्यासाठी पैसे नाहीत शासनाने ती रक्कम अदा करावी तसेच मी मंगळवारी येणार आहे आल्यावर काय आहे ते बघतो. तसेच केजचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी फोन रिशिव्ह न केल्याने त्यांची प्रतिक्रीया समजू शकली नाही.
Leave a comment