खा.प्रीतमताई मुंडेकडून केज येथील मुंडे परिवाराचे सांत्वन

 

केज  । वार्ताहर

 

केज येथील सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे शेतकऱ्यांचे वादळ, शिर्डी एक्स्प्रेस, अशा विविध वृत्तपत्रात व चॅनल चे काम करणारे केज येथील आदर्श पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार प्रकाश मुंडे यांच्या आईचे  दि.१४ रविवार  रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते.

प्रकाश मुंडे यांच्या आईचे दु:खद निधन झाल्यामूळे मुंडे कुटुंबाना धीर देण्यासाठी दि.२४ बुधवार रोजी बीड च्या लोकप्रिय खासदार प्रीतमताई मुंडे व केज अंबाजोगाई मतदार संघाच्या आमदार नामीताताई मुंदडा यांनी केज येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन सांत्वन केले, व धीर दिला. 

या प्रसंगी आमदारपती अक्षय (भैय्या) मुंदडा, रमाकांत बापू मुंडे,  महिला आघाडी 

जिल्हाध्यक्षा उषाताई मुंडे,जि.प.सदस्य संतोष दादा हांगे,सभापती विष्णू घुले, भाजप केज तालुका अध्यक्ष भगवान केदार, बीड जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ.वासूदेव नेहरकर. सुरेंद्र तपसे काका. मुरलीधर ढाकणे. सुनील घोळवे,दत्ता धस,राहुल गदळे,संतोष जाधव व भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते, मित्रपरिवार नगरसेवक शिवाजी अप्पा हजारे, शिवाजी घुले साहेब ( लाईनमेन) , राजेसाहेब ढाकणे यांचीही उपस्थिती होती.

प्रकाश मुंडे यांचे वडील स्वर्गीय कै. एकनाथ ग्यानबा मुंडे हे  ( भोगलवाडीकर ) ग्रामसेवक होते, रुक्मिणीबाई मुंडे याना मुलगा प्रकाश मुंडे ( pm) , सुन राजेश्री प्रकाश मुंडे नातवंडे राहुल मुंडे, ओमकार मुंडे, सौ. अश्विनी बिभीषण तोंडे, सौ. तेजस्विनी अनिल तोंडे. सोनाली प्रकाश मुंडे  असा परिवार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.