जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदीचा निषेध;

व्यापार्‍यांनी बंद यशस्वी करण्याचे आवाहन 

बीड । वार्ताहर

केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदीचा निषेध करत येत्या 26 फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंदमध्ये सर्व व्यापारी संघटना सामील झाल्या आहेत. दरम्यान या बंदला बीड जिल्हा व्यापारी महासंघासह बीड शहर व्यापारी महासंघानेही जाहीर पाठींबा दिला असून व्यापार्‍यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी करावा असे आवाहन व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

भारत बंदसंबंधी व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.24) बीड येथे एमआयडीसीतील मॉ वैष्णो पॅलेसमध्ये बीड जिल्हा व शहर व्यापारी महासंघाची व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी सीए भानुदास जाधव व सीए गोपाल लड्डा यांनी मार्गदर्शन केले. जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. या भारत व्यापार बंदला  देशातील 40 हजार संघटना व 8 करोड व्यापार्‍यांनी पाठींबा दिला असून हे सर्व व्यापारी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन  जीएसटीच्या जाचक तरतुदी विरुद्ध लढा पुकारणार आहे. 
सरकारला विनंती आहे की, त्यांनी मागच्या दाराने पुन्हा एकदा इनस्पेक्टर राज आणून भ्रष्टाचाराला खतपाणी न देता जीएसटी मधील कुठलीही सुनावणी न करता किंवा नोटिस न देता माल जप्त करणे, जीएसटी रजिस्टरेशन रद्द करणे, रिटर्न्स  भरू न देणे, गुन्हे दाखल करणे इत्यादी कलमा मध्ये  संशोधन करून व्यापार्‍यांना  जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता येतील  असे कायद्यात बदल घडवून आणावे. म्हणजे व्यापार्‍यांना आपल्या व्यापार  वाढी  कडे  लक्ष देता येईल. बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने भारत व्यापार बंदमध्ये सहभाग घेण्याचे ठरवले असून जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामीण,  शहर संघटना व सर्व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या भारत व्यापार बंदमध्ये  सहभाग नोंदवून आप आपल्या शहरातील व ग्रामीण भागातील सर्व दुकाने बंद राहातील याची काळजी घ्यावी असे आवाहन बीड शहर व बीड जिल्हा व्यापारी महासंघाने केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.