हिवरसिंगा येथे 47 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ
बीड । वार्ताहर
टोल आणि झोल संस्कृती ही सार्वजनिक लोकशाहीला लागलेली कीड आहे. विकासात असे स्पीडब्रेकर येतच असतात गचपण आलेले आहे ते वेळ आल्यानंतर काढून टाकले पाहिजे आपल्यासाठी कोण महत्त्वाचा हे मतदारांच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे पुढे होणार्या कामात अडथळे येणार नाहीत. जातीपातीच्या व तात्पुरत्या भावनेवर न जाता डोळसपणे जागृत राहणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत ते मंत्रालय ही लोकशाहीची साखळी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
हिवरसिंगा या ठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते 47 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. ग्रामपंचायत इमारत सभागृहाची इमारत सिमेंट रस्ता गावांतर्गत सिमेंट रस्ते या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.16) करण्यात आले. यावेळी सभापती उषाताई सरवदे, विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, गणपत डोईफोडे, सुधाकर मिसाळ, सखाराम मस्के, सुभाष क्षीरसागर, चंद्रकांत सानप, किरण चव्हाण, सतीश काटे आदींची उपस्थिती होती
प्रास्ताविक अॅड चंद्रकांत सानप यांनी केले. ते म्हणाले, 25-15 अंतर्गत आणि 14 व्या वित्त आयोगातून हिवरसिंगा गावासाठी 47 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये गावात हायमास्ट लाईट शालेय साहित्य गावांतर्गत रस्ते नाली मुक्त गाव यासाठी नाली बांधकाम साधी कामे अण्णांच्या पाठपुराव्यामुळे होत आहेत औरंगपूर पाणीपुरवठ्यासाठी देखील प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावावा तसेच हिवरसिंगा ते औरंगपूर या रस्त्याच्या कामासाठी देखील प्रयत्न होणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली.यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, हिवरसिंगा तलावाची राहिलेली कामे आपण करूनच घेणार आहोत. गाळ काढण्यासाठी संस्थेचा पुढाकार घेऊन पाण्याची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्न करू गावाची जोडणी महत्त्वाचे आहे. रस्ते महत्त्वाचे असतात, शिरूर तालुका आता अनेक रस्त्यांनी जोडला जात आहे. दोन मोठे रस्ते एक 170 कोटीचा आणि एक 150 कोटीचा असे दोन रस्ते होऊ लागले आहेत तर आपेगाव ते भूम हा रस्ता देखील आता होणार आहे. गेल्यावर्षी शिरूर तालुक्यात 35 कोटीची कामे होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत विकासाचा रथ हा न थांबणारा असतो प्रयत्न महत्त्वाचे असतात परिसरातील अनेक गावांचे विकासाचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी दाखल आहेत, यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत विकासाची योजना गावच्या दारी पोहोचली पाहिजे विकासाची गाडी रुळावर चालायला हवी बदलल्यानंतर थोडा वेळ लागतो पण खंड पडू देणार नाही. रायमोहा चौकाचे रुंदीकरण करून तेथे मोठे बस स्थानक व्हावे यासाठी देखील प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे आवश्यक तेथे लक्ष देऊन महत्त्वाची कामे करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यास ही कामे लवकरच पूर्ण होतील. शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. मध्येच योजनेचा मलिदा गायब होतो का? याकडे जरा लक्ष द्या असेही ते याप्रसंगी म्हणाले.
Leave a comment