अकृषी परवानग्या मुदतीत देण्याचेही आदेश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अकृषी आदेशा बाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. सामान्य जनतेची होणारी फसवणूक जन आंदोलनाने पुढे आणली होती. याची गंभीरतेने दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी स्पष्ट आदेश काढून या वादावर आता तुकडा पडला आहे. त्याचबरोबर महसूल यंत्रणेत काम करणार्या अधिकार्यांना तंबी देत त्यांनी अकृषी परवानग्या मुदतीत देण्याचेही आदेश दिले आहेत. जिल्हाधिकार्यांची हे आदेश अभिनंदनास पात्र असल्याची प्रतिक्रिया जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी दिली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रकरणी चांगलेच लक्ष घातले होते. त्यामुळे महसूल दप्तरी नसलेला कोणत्याही बोगस कागदा आधारे खरेदीखते नोंदवने बंद झाले होते. आता या वादावर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हातोडा मारला असून हे वाद आता उपस्थित होणार नाहीत. सामान्य जनतेची फसवणूक होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर नव्याने अकृषिक परवाना मागण्यासाठी जर कोणी अर्ज केला तर विलंब टाळावा आणि या नवीन सुधारणे नुसार अकृषी प्रकरण महसूल अधिकार्यांनी विहीत मुदतीत निकाली काढावीत, असेही आदेश जगताप यांनी दिले आहेत. यामुळे अनेकांची खोळंबून पडलेली कामे आता मार्गी लागतील.
कायद्यातील तरतुदींचा जिल्हाधिकार्यांच्या या आदेशांमध्ये पुरेपूर अभ्यास दिसत असून सर्व तरतुदीं आणि त्याची मांडणी पहिली तर हा आदेश अतिशय स्पष्ट आणि बोलका वाटत आहे. रजिस्ट्री ऑफिस मधील भ्रष्टाचार थांबण्यास आता मदत होईल. त्याच बरोबर लोकांनीही आता नियमाप्रमाणे वागण्याचे शिकणे आवश्यक आहे.आता कोणीही बोगसगिरी करणार नाही. खर्याला अडचणीही येणार नाहीत. रस्ते मोठे असावेत, सुविधा देता याव्यात, त्याच बरोबर लोकांची फसवणूक टळावी, कायद्याचे पालन व्हावे, मोकळ्या जागा नियमानुसार मोकळे रहाव्यात, सार्वजनिक सुविधा साठीची जागा ही त्याच वापरता यावि आणि अरुंद रस्त्यांमुळे वस्त्यांमधील रस्त्यांवरून वाहतूक करणे जिकिरीचे होते, ते ही आता होणार नाही.जन आंदोलनाचा लढा बोगस कागदपत्र तयार करून शासनाला आणि प्लॉट अथवा घर खरेदी करणार्यांना फसविणार्याच्या विरोधात आहे. सामान्यांसाठी हा लढा नाही, याची या क्षेत्रात काम करणार्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे. कोणत्याही गरीबाची फसवणूक कोणीही करू नये अथवा त्यालाही दुष्परिणाम भोगावे लागतील, असे ही अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकार्यांच्या भेटीची वेळ मागितली असून जिल्हाधिकारी यांचे बरोबर यासह अन्य मुद्यांवर चर्चा करणार असल्याचेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.
Leave a comment