-मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे अंबाजोगाईत धरणे आंदोलन 

अंबाजोगाई / वार्ताहर

इंधन दरवाढ कमी करून कोरोना काळातील वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावीत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवार,दिनांक 10 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच सदरील मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना उपजिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेड पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,गेल्या मार्च २०२० पासून महाराष्ट्र राज्य, देश व जगभरात कोरोनाच्या महामामारीमुळे राज्यातील मध्यमवर्गीय,व्यापारी,कामगार,शेतकरी सर्वांना अतोनात त्रास झाला असून छोटे- मोठे उद्योगधंदे,व्यापार,दुकाने सर्व बंद झाले होते.त्यामुळे सर्वांना आर्थिक झळ बसली गेली.हा काळ फक्त जिवंत राहण्यासाठी आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असे आपणच नेहमी प्रसार माध्यमांद्वारे जनतेला आवाहन करीत होतात.मात्र याच कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव वीज बिले पाठवली.त्यावेळी संभाजी ब्रिगेड यांचेसह अनेक पक्ष, संघटनांनी आवाज उठविला,आंदोलने केली केली.तेव्हा आघाडी सरकारचे वीजमंत्री नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू,कमी करू असे आश्वासन जनतेला दिले होते.मात्र आता शासनाने थकीत बिले न भरल्यास सर्व

नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन नोटीसा पाठविल्या आहेत.हा मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून शासन हुकूमशाही करीत असल्याची जनसामान्यांची भावना निर्माण झाली आहे.यातून संताप व उद्रेक झाल्यास आपणाच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.सामान्य जनतेचा आक्रोश वाढत आहे.त्यामुळे सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावीत.तसेच नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,गॅसचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे.यामुळे या दोन्ही विषयी आपण गंभीरपणे नोंद घ्यावी. आणि याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावेत व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावीत अन्यथा या जनहिताच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दि.१०.०२.२०२१ रोजी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.व या नंतर जर सदरील मागण्या मान्य झाल्या नाहीतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.संभाजी ब्रिगेडच्या मागणीस व धरणे आंदोलनास रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटना,शेतकरी कामगार पक्ष,वंचित बहुजन आघाडी,प्रहार संघटना,एम.आय.एम या राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठींबा दर्शविला.सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेड बीड पुर्वचे जिल्हाध्यक्ष प्रविण कुसूम उत्तमराव ठोंबरे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रणजित डांगे,जिल्हासंघटक सुरज देशमुख,तालुकाध्यक्ष संभाजीराव घोरपडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशिद,वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. नंदकिशोर सोमवंशी, शहराध्यक्ष अमोल हातागळे,खाजामियाँ पठाण,अनिल कांबळे, शेकापचे शहराध्यक्ष भाई वजीर शेख,नारायणराव मुळे,साहेबराव गवळी,अॅड.डी.आर.गोरे,मोबीन देशमुख,राम ढोबळे,बालासाहेब घोरपडे,अॅड.प्रशांत शिंदे,सिध्देश्वर पुरी, ओंकार गंगणे,रत्नदीप सरवदे,अॅड.भोसले यांच्या स्वाक्ष-या आहेत.धरणे आंदोलन स्थळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.