शेकापचे बीडमध्ये धरणे आंदोलन
बीड | वार्ताहर
गॅस, पेट्रोल-डिझेलची झालेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत, लॉकडाऊन काळातील नागरिकांचे वीजबील माफ करावे या मागण्यांसाठी बुधवारी (दि.10) भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात शेकापने म्हटले आहे, शासनाने वरील मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन दरवाढ मागे घ्यावी तसेच शेतकर्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडू नयेत. वीज बिलाची सक्तीने वसुली केली जावू नये. यावेळी जिल्हा चिटणीस भाई बाळासाहेब घुमरे, ए.बी.लोंढे, अॅड.राजेंद्र नवले, विष्णुपंत घोलप, नारायण थोरवे, सय्यद शाकेर, वाल्मीक कदम, दत्ता कागदे, सय्यद सोहील, सय्यद अहेमद, शेख इमरान आदी सहभागी झाले होते.
Leave a comment