शिरुर । वार्ताहर
शिरुर नगरपंचायतने चूकीच्या अटी,शर्थी टाकून पाणी नियोजन केल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांना केवळ 35 मिनिटे पाणी तेही आठ ते दहा दिवसाला मिळते. त्यामुळे नागरिकांना भर हिवाळ्यात पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
नळांना आलेले पाणी केवळ चार-पाच दिवसच पुरते. इतर दिवशी मात्र नागरिकांना विकतचे पाणी गेवून संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. उथळा, सिंधफणा या दोन धरणातून शहरला पाणी पुरवठा होतो. हे दोन्ही धरणे तुडूंब भरलेले असतानाही निष्क्रीय नगरपंचायतने चूकीचे नियम लागू करुन पाणी पुरवठा होत असल्यामुळे जनता बेजार झाली आहे. भर हिवाळ्यात मुबलक पाणी मिळत नसेल तर उन्हाळ्यात शहरच सोडून इतर ठिकाणी जावे लागते की काय, असा दोन प्रश्न जनतेला पडला आहे. विकास कामाच्या नावाखाली निकृष्ट कामे करुन आर्थिक स्वार्थ साधून तृप्त झालेल्या माजी नगरसेवकांना पाणी प्रश्नाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येणार्या निवडणूकीत जनता फक्त पाणी प्रश्नावरच भडीमार करुन आजी-माजी व भावी नगरसेवकांना जाब विचारणार असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे. तेव्हा कर्तव्यदक्ष आ.सुरेश धस यांनी शिरु नगरपंचायला किचकट नियम बदलून आठ दिवसाला एक तास पाणी पुरवठा करण्याचे सूचित कराव अशी मागणी जनतेतून होत आहे.
Leave a comment