बीड । वार्ताहर
जिल्हा रेशीम कार्यालय बीड अंर्तगत नविन रेशीम शेती करू ईच्छिणार्या शेतकर्यांची निवड करून नाव नोदणी करण्याकरिता जिल्हयातील सर्व तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतीमध्ये दि. 25 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहून महारेशीम अभियान 2021 हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. रेशीम उद्योग हा कृषी आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. खेडयांमध्येच मजुरी उपलब्ध होत असल्यामुळे शहराकडे होणरे स्थलांतर थांबण्यास या उद्योगामुळे मदत होत आहे. जिल्हयातील हवामान हे रेशीम उद्योगास पोषक असुन जिल्हात अत्यंत कमी पर्जन्यमान असुनसुध्दा तुती वृक्षाची लागवड करून रेशीम उत्पादन करण्यास भरपुर वाव आहे.जिल्हाचा कृषी विकासदर वृध्दी बरोबर ग्रामीण भागातील शेतकर्यांचे आर्थिकस्तर व जिवनमान उंचवण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. जिल्हयात मागील काही वर्षापासून रेशीम उद्योग हा हमखास व शाश्वत शेती उत्पादन देणारा उद्योग झाला असुन जिल्हयात रेशीम उद्योग करणार्या शेतकर्यांचे एकरी सरासरी रू.100 लक्ष उत्पादन झाले आहे.
जिल्हयातील काही शेतकर्यांना रेशीम उद्योगापासुन रू.300 लक्ष पर्यंत एकरी उत्पादन झाले आहे. सन 2019-20 मध्ये जिल्हा रेशीम कार्यालया अंर्तगत सर्वाधिक तुतीची लागवड होउन जिल्हयाने तुती लागवड व रेशीम कोष उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2019-20 मध्ये जिल्हा कार्यालया मार्फत शेतकर्यांना 7.47 लक्ष रेशीम अंडीपुंज पुरवठा केले असून त्यापासुन शेतकर्यांनी 532.967 मे.टन रेशीम कोषाचे उत्पादन घेतले असुन शेतकर्यांना रेशीम कोष विक्री पासुन 15.99 कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. जिल्हा रेशीम कार्यालया अंर्तगत मग्रारोहयो राबवली जात असून योजने अंर्तगत अल्पभुधारक शेतकर्यांना रु. 326790 तिन वर्षात साहीत्य व मजुरी अनुदान दिले जाते. सन 2019-20 जिल्हा रेशीम कार्यालय व कृषि विभाग मार्फत पोकरा प्रकल्प (नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प) अंर्तगत योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या गावांना, तुती रोपवाटीका, तुती लागवड, किटक संगोपनगृह व किटक संगोपन साहीत्य योजने करीता शेतकर्यांना रु. 220229/- अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जिल्हा रेशीम कार्यालया अंर्तगत जिल्हा वार्षिक योजनेमधून रेशीम लाभार्थ्यांना अंडीपुंज खरेदी, कोष उत्पादन अनुदान दिले जाते. जिल्हा रेशीम कार्यालया मार्फत जिल्हा वार्षिक योजनेमधून रेशीम लाभार्थ्यांना शेतकरी प्रशिक्षण दिले जाते व शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला जातो तसेच प्रचार व प्रसिध्दीसाठी महारेशीम अभियान, मेळावे व प्रात्यक्षिक आयोजित केले जातात.जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी महारेशीम अभियान 2021 कार्यक्रम अंर्तगत सहभाग नोंदवुन नाव नोदणी करावी व संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्रे.1,जिल्हा रेशीम कार्यालय,बार्शी रोड, बीड यांनी केले आहे.
Leave a comment