बीड । वार्ताहर
शहरातील फुलाईनगर भागात एका विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. आज मंगळवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
शहर पोलीसांच्या माहितीनुसार, रेणुका रघुनाथ देवकर (32) असे त्या महिलेचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास या विवाहितेने राहत्या घरात दोरीने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास हा प्रकार तिच्या पतीला निदर्शनास आला. त्यानंतर पोलीसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी शहर ठाण्याचे निरीक्षक रवि सानप, सहाय्यक निरीक्षक घनशाम आंत्रप, सहाय्यक फौजदार नरेश चक्रे यांनी धाव घेतली. पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत विवाहितेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे शहर पोलीसांनी सांगितले.
Leave a comment