पालिकेविरुध्द हायकोर्टात तक्रार करणार-अमर शेख
बीड । वार्ताहर
बीड नगरपरिषदेत क्षीरसागर यांच्या मिलीभगतमधून सध्या सावळा गोंधळ सुरु आहे. शुक्रवारी (दि.5) बीड नगरपरिषदेने 2020-21 सालासाठी बीड नगरपरिषद अंतर्गत असणारे बीड शहर आठवडी बाजार व शहरातील दैनंदिन मंडी हातगाडे मच्छि मार्केट ठिकाणाहून जमा होणारा महसूल ठेका देण्याबाबत ई-लिलाव सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यानुसार शुक्रवारी नगरपरिषदेने तपासणी सूची प्रसिद्ध केली.
या सूचीमध्ये 5 संस्थांनी सहभाग नोंदवले. या मधील 3 संस्था वगळण्यात आल्या असून संदीप कल्याणराव पाटील ही संस्था व सांगळे शशिकांत चंद्रकांत यांची संस्था दुसर्याच्या खात्यावरून धनाकर्ष हा दुसर्याच्या खात्यावरून दिलेला आहे; मात्र हा धनाकर्ष 3 महिन्यासाठी वैध असतानादेखील या दोन्ही संस्था मुख्याधिकारी यांनी राजकीय दबावपोटी अपात्र केल्या आहेत. लिलावासाठी निवडलेल्या संस्था या क्षीरसागर यांच्याच समर्थकांच्या असून जाणीवपूर्वक नियम डावलून स्वार्थासाठी हे लिलाव मर्जीतील बगलबच्यांना दिले जात आहेत असा आरोप एमआयएमचे गट नेते अमर शेख यांनी केला आहे
याबाबत दिलेल्या पत्रकात अमर शेख यांनी म्हटले आहे, याबाबत आपण जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार केली आहे.ई-लिलावाच्या बाबतीत धनाकर्ष कोणाच्याही नावाने आले. संबंधित लिलाव कळणार्या शासकीय संस्थेच्या खात्यावर निधी जमा होणे आवश्यक असते; मात्र बीड नगरपरिषदेने नवीन नियमाचा उत्कर्ष करत स्वार्थासाठी पात्र असणार्या संस्थाना डावलण्याचे काम केले आहे. हे चुकीचे असून जनतेचा घामाचा पैसा बगलबच्चांना स्वाधीन करण्यास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना बीडची जनता माफ करणार नाही. या प्रकरणाबाबत आपण उच्च न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचेही नगरसेवक अमर शेख यांनी म्हटले
Leave a comment