दागिण्यांसह 98 हजारांचा ऐवज लंपास
माजलगाव । वार्ताहर
घर कुलूपबंद करुन आजारी आईला भेटण्यासाठी गेलेल्या एका सरकारी कर्मचार्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील दागिण्यांसह महत्वाची कागदपत्रे असा एकूण 98 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.
कलीम जैनुद्दीन सय्यद हे परळी येथील उपविभागीय कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे माजलगाव येथील जुन्या बीअॅन्डसी क्वॉटरमध्ये घर आहे. 22 ते 24 जानेवारी दरम्यान ते त्यांची आई आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी घराला कुलूप लावून बीड येथे गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयडा उचकून आत प्रवेश केला. नंतर 70 हजारांची रोकड, चांदीचे दागिणे, एलईडी, दोन विद्युत पंप, दोन पंखे, पॅन व आधार कार्ड असा एकुण 98 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. गावावरुन परतल्यानंतर सय्यद यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्यांनी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली.
Leave a comment