करुन खंडणी उकळणारा गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेची पुण्यात कारवाई
बीड । वार्ताहर
अंबाजोगाई येथील एका कापड व्यापार्याचे सिनेस्टाईल अपहरण करुन साडेपाच लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार 4 जानेवारी रोजी घडला होता. या प्रकरणातील एका आरोपीला रविवारी (दि.24) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून त्यास तपासकामी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
भानुदास सुधाकर मोरे (रा.आनंदनगर, अंबाजोगाई) यांचा शहरात कापड व्यवसाय आहे. 4 जानेवारी रोजी दहा वाजता ते शहरातील शिवाजी चौकातून जात होते. यावेळी त्यांची दुचाकी अडवून अनोळखी चार ते पाच जणांनी बेंगलोर येथील साडीच्या व्यापार्याची 16 लाख रुपये उधारी वसुलीसाठी आलो असल्याचे सांगत त्यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. त्यानंतर केजमार्गे मांजरसुंबा येथे आणून 20 लाख रुपये खंडणीची मागणी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, भीतीपोटी भानुदास मोरे यांनी नातेवाईकांकडून साडेपाच लाख रुपये मागवून स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी तपासकामी गुन्हे शाखा व अंबाजोगाई शहर ठाण्याचे प्रत्येकी एक अशी दोन पथके नेमली होती. गुन्हे शाखेच्या पथकाला यातील आरोपी पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी.जी.दुल्लत, हवालदर शेख सलीम, विकास वाघमारे, मनोज वाघ, राहुल शिंदे, युनूस बागवान, संतोष हारके यांचे पथक पुण्याला रवाना झाले. गोपनीय माहितीवरुन प्रज्वल नामदेव धावडे (रा.भिगवन ता.इंदापूर जि.पुणे) यास रविवारी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला;परंतु त्यास खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्हा कबूल करुन साथीदारांची नावेही सांगितली. त्याच्या चार ते पाच साथीदारांचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी सांगितले. त्याच्याकडून कार (क्र.एमएच 42 एएक्स-4170) व मोबाइल जप्त करण्यात आला.
Leave a comment