गेवराई । वार्ताहर
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तालुक्यातील विठ्ठलनगर फाट्या जवळ टेम्पो व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील विठ्ठलनगर येथील माजी सरपंचाचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.25 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. झाला. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास घडली.
विठ्ठलनगर येथील माजी सरपंच बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर (55 रा.रेवकी ता.गेवराई) व गोरख लिबांजी शेंडगे (45 रा.रेवकी ता.गेवराई) ही दोघे दुचाकी क्रमांक एम.एच 23 व्ही 4706 वरून गेवराई येथील काम आवरून आपल्या तालुक्यातील विठ्ठलनगर या गावी जात असताना त्याच दरम्यान शहागड हुन गेवराई कडे भरधाव वेगाने टेम्पो क्र (एम.एच 12 के.पी 9500) हा आला असता हे दोन्ही वाहाने धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलनगर फाट्या जवळ आले असता टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन या झालेल्या भिषण अपघातात विठ्ठलनगर येथील माजी सरपंच बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर व गोरख लिबांजी शेंडगे हे गाडी वरून रोडला आदळले. यामध्ये बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गोरख शेंडगे यांना पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा अधिच डॉक्टराने मृत घोषीत केले. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a comment