विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते होणार
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादीकडून आवाहन
गेवराई । वार्ताहर
मौजे चकलांबा येथील जि.प.माध्यमिक शाळा इमारत, उमापूर आणि चकलांबा येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, राज्यमार्ग ते दैठण रस्ता, मादळमोही ते शहाजानपूर रस्ता, रेवकी ते लुखामसला रस्ता, बोरगाव (जुने) ते पैठण पालखी मार्ग रस्ता या रस्त्यांचे डांबरीकरण आणि मौजे खळेगाव येथील को.प.बंधार्यांचे बांधकाम या सुमारे चार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले आहे.
बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून गेवराई विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांना निधी मंजुर केला जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांकरीता सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. यामध्ये मौजे चकलांबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी 100 लक्ष रु., मौजे चकलांबा येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी 25 लक्ष रु., मौजे उमापूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी 25 लक्ष रु., राज्यमार्ग 50 ते लुखामसला-दैठण रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामासाठी 67 लक्ष रु., मादळमोही ते शहाजानपूर रस्त्याच्या डांबरीकरणासह चार नळकांठी पुलाचे बांधकाम करण्यासाठी 44 लक्ष रु., रेवकी ते लुखामसला रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 39 लक्ष रु., मौजे बोरगाव (जुने) ते पैठण पालखी मार्ग रस्ता डांबरीकरणासाठी 22 लक्ष रु. आणि मौजे खळेगाव येथील को.प.बंधार्याच्या बांधकामासाठी 87 लक्ष रु. अशा एकुण सुमारे चार कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि.26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. शहाजानपूर, सकाळी 11 वा.चकलांबा, दुपारी 12 वा. खळेगाव, दुपारी 1 वा. उमापूर, दुपारी 2 वा. बोरगाव (जुने) तर सायं.5 वा. लुखामसला येथे प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, रा.काँ.युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, माजी जि.प.सदस्य डॉ.विजयकुमार घाडगे, पं.स.सदस्य तय्यबभाई, परमेश्वर खरात, जयभवानीचे संचालक राजेंद्र वारंगे, माजी सभापती बबनराव मुळे, बळीराम रसाळ, दिपक वारंगे, जिल्हा बँकेचे संचालक कैलास नलावडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ठिकठिकाणी होणार्या या भुमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a comment