आष्टी / शरद रेडेकर
प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींना पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान केला जातो. बीड येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आष्टी तालुक्यातील 9 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत आष्टी तालुक्यातील 9 विद्यार्थ्यांनी राज्य यादीत क्रमांक मिळविला आहे.यामध्ये कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा आणि आष्टी येथील वसुंधरा विद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत बीड जिल्ह्यातील 11 विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक गटात यश संपादन केले.13 पूर्व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.अशा एकूण 24 विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती बीड जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
आष्टीतील या विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
ईश्वरी प्रमोद काळे ,पार्थ बाबासाहेब शिंदे,जिशान सलीम शेख,संस्कार रघुनाथ मुटकुळे,ओम मोहन गलांडे,तनीषा नितीन जानापुरे,यश रावसाहेब काळे,प्रणव हनुमंत केदार,संस्कृती अंकुश बडे यांचा समावेश आहे.
Leave a comment