विनानंबर फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई का नाही?

केज । वार्ताहर

शहरात दुचाकी व चारचाकी वाहनचालक विणानंबर, फॅन्सी नंबर प्लेट,महापुरुष, दादा, नेते,आई असे टोपण नावे गाडीनंबर च्या प्लेटवर टाकून मोठे कर्णकर्कश हॉर्न,भोंगे वाजवून लोकांना त्रस्त करत आहेत.गाडीला प्रचंड मोठ्या आवाजाचे सायलान्सर लावून वाजवत आहेत.रुग्णवाहिका चे हॉर्न इतर वाहनचालक वापरत आहेत.भरधाव दुचाकी गाड्या पादचारी,इतर प्रवाशांना हॉर्न वाजवून त्रस्त करत आहेत.


शहरासह तालुक्यात विना परवाना वाहन चालक काळ्या रंगाच्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट अनेक गाड्या नंबर प्लेट नाहीत सुसाट वेगाने वाहन चालक वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. एकमेकांशी स्पर्धा करत अशा दुचाकीस्वारांची टोळके भरधाव वेगाने फिरताना दिसत आहेत पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष घालून वेळीच अशा गाडी चालकांवर,मालकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नादकरायचा नाय,वटच,साहेब,अण्णा, दादा,बाबा,राजेशाही,झिंगाट,मालक, छावा, वाघ,भाऊ,सैनिक,सर, चल,झलक,पलट,सरपंच,मामाभांजे,अशा कितीतरी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून गाडीवरच्या कोर्‍या पाठीवर कोणताही नंबर न टाकता पाटीवर लिहले जाते

कुणाच्याही  गाडीवर प्रेस

अनेक चारचाकी ,दुचाकी गाड्यावर प्रेस असे लिहून मोकाट फिरत आहेत.प्रिंट ,किंवा ई मीडिया चे पत्रकार नसून ही गाडीवर प्रेस लिहून सुसाट फिरत आहेत. अनेकवेळा विणानंबर गाडीवर प्रेस नाव लिहून काळे धंदे सुरू केले जात आहेत.यांमुळे खर्‍या पत्रकारितेचे नाव बदनाम होत आहे.अशा गाड्यांची पोलिसांनी पडताळणी करावी

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.