बीड । वार्ताहर
येथील राज्य परिवहन महामंडळचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना कार्यालयात जावून वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यासह इतर 8 ते 10 जणांवर गुन्हाही नोंद झाला. परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी शुक्रवारी कर्मचारी आक्रमक झाले होते. दिवसभर काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
भांडार विभागातील एका महिला कर्मचार्यावर कामचुकारपणा केल्यामुळे कारवाई कारवाई करण्यात आली. त्या महिलेवर कारवाई का केली, असे म्हणत लाकडी दांडा उगारून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पुन्हा शिवीगाळ केली. याप्रकरणी बांगरसह 8 ते 10 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याच घटनेचे पडसाद शुक्रवारी दिसले. कार्यालयात येण्यापूर्वीच विविध संघटना आणि कर्मचार्यांनी एकत्र येत या गुंडगिरीविरोधात निदर्शने केले. बांगरसह इतरावंर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले. तसेच दिवसभर काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
Leave a comment