बीडमध्ये 22 तर अंबाजोगाईत 23 जानेवारीला शिबीर
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात थॅलेसेमिया व हिमोफिलिया रूग्णांची वाढत आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात बीड व अंबाजोगाई येथे मोफत तपासणी शिबीर 22 व 23 जानेवारीला आयोजित केले आहे. यातून रुग्णांना मोफत औषधेापचार करण्यासह जनजागृती केली जाणर आहे. रक्तपेढी, एन.व्ही.एच.सी.पी व एच.आय व्ही विभाग, जिल्हा रूग्णालय बीड व थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप, परभणी च्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.
थँलेसेमिया मेजर हा रक्तातील आनुवंशिक गंभीर आजार रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस अथवा औषध नाही. आजार झाल्यानंतर एक वर्षाच्या आत बालकाला हा आजार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे जनजागृती हाच यावर एकमेव पर्याय आहे. हाच धागा पकडून परभणी येथील थँलेसेमिया सपोर्ट ग्रुपने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मोफत तपासणी व उपचार पध्दती सुरू केली . बीडमध्येही या आजाराचे रूग्ण आहेत . त्यामुळे बीड जिल्ह्यातही मोफत शिबीर घेण्याचे नियोजन केले आहे. सर्व थॅलेसेमिया ग्रस्त बालक व त्यांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते,अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड , शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे.गेवराई, माजलगाव, वडवणी, आष्टी, पाटोदा शिरूर व बीड तालुक्यातील रूग्णांसाठी 22 जानेवारी रोजी आदित्य वैद्यकीय महाविद्यालयात येथे हे शिबिर होणर असून रक्त विकार तज्ञ डॉ.तुषार इधाते व डॉ.श्रध्दा चांडक (औरंगाबाद),डॉ.राम देशपांडे वर्गा-1 बालरोग तज्ञ जिल्हा रूग्णालय, डॉ अनुराग पांगरीकर आय एम ए अध्याक्ष तथा उपाध्याक्ष बालरोग तज्ञ संघटना बीड, डॉ पाडूरंग तांबडे अध्याक्ष बालरोग तज्ञ संघटना बीड, डॉ. सपिन पोतदार सचिव बालरोग तज्ञ संघटनाबीड, तसेच डॉ. लाड, डॉ विघ्ने बालरोग तज्ञ जिल्हा रूग्णालय बीड हे तपासणी करणार आहेत.तर परळी, धारूर, अंबाजोगाई व केज मधील रूग्णांसाठी स्व.रा.ती. ग्रामिन वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई येथे 23 जानेवारी रोजी आयोजित केले असून रक्त विकार तज्ञ डॉ. मनोज तोष्णीवाल (औरंगाबाद) हे तपासणी करणार आहेत.
Leave a comment