मेंदू विकार व बालरोग नव्याने दोन विभाग सुरू

बीड  । वार्ताहर

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयावर मोठा परिणाम झाला होता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण सेवेमध्ये अधिकाधिक सुसूत्रता येण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच खाजगी क्षेत्राचा सहभाग घेण्याचे आदेश सरकारने दिले होते तेव्हा 10 ऑगस्ट 2020 रोजी लोटस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शासनाने मनुष्य बळासहित वापरासाठी परवानगी दिली होती आता अन्य उपचारासाठी लोटस रुग्णालय पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ अमित काळे डॉ अशिष गर्जे, डॉ श्रीनिवास शेळके,डॉ सय्यद हसिब यांनी दिली आहे.


बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर शासकीय यंत्रणेवर त्याचा ताण पडू लागल्याने रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालय शासनाने ताब्यात घेतले होते त्यामध्ये लोटस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा समावेश होता गेल्या सहा महिन्यापासून या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र 15 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या रुग्णालयाला दिनांक 16 जानेवारीपासून अन्य उपचारासाठी पुर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत सध्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असून त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या सेवेमध्ये बदल करण्यात आले आहेत लोटस हॉस्पिटल मध्ये आता नव्यानेच अन्य न्यूरोसर्जरी व बालरोग विभाग  सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे याठिकाणी बीड जिल्ह्यातील पहिले पूर्णवेळ मेंदूविकार व शस्त्रक्रिया तज्ञ डॉ विशाल पिंगळकर  (न्यूरोसर्जन) फक्त लोटस हॉस्पिटलमध्ये च उपलब्ध असतील व डॉक्टर सुरज बांगर  बालरोग विभाग तज्ञ हे देखील पूर्ण वेळ उपलब्ध असतील. आता या नविन दोन विभागासह लोटस हॉस्पिटल  उपचारासाठी आता पूर्ववत 24 तास सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.