प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यात यावर्षी सतरा हजार हेकटर वर तुरीचे उत्पादन घेण्यात आले आहे.पाऊस चांगला असल्याने व वेळेवर झाल्याने या वर्षी शेतकर्यांना तुरीचे विक्रमी उत्पन्न झाले मात्र या पिकाला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने शासकीय खरेदी केंद्र सुरू होणार कधी असा प्रश्न विचारला जात आहे. नोंदणी सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलट आला असून प्रत्यक्ष खरेदी मात्र सुरू न झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
हमीभावाने फेडरेशन तुर खरेदीची नोंदणी दिनांक 28 डिसेंबर पासून सुरू झाली आष्टी तालुक्यामध्ये पाच ठिकाणी तूर खरेदी केंद्रस मान्यता मिळाली असून हजारो शेतकर्यांनी या खरेदी केंद्रावर तुर विक्रीसाठी नोंदणी केली आहे मात्र नोंदणी होऊन तब्बल महिन्याचा कालावधी होत आला तरीही प्रत्यक्ष तूर खरेदी मात्र सुरू झालेली नाही हमीभावाने सहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे तूर खरेदी केली जाणार असून सध्या बाजारामध्ये पाच हजार पाचशे या भावाने तुरीची विक्री होत आहे. शेतकर्यांना नालाजास्तव कमी भावाने तुर विक्री करावी लागत आहे प्रति क्विंटल 500 रुपये पर्यंत शेतकर्यांचा आज घडीला तोटा होत असून शासकीय तुर खरेदी केंद्र सुरू कधी होणार याची शेतकरीवर्ग प्रतीक्षा करत आहे. अनेक शेतकर्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे खाजगी बाजारामध्ये कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे.लग्नसराईचे दिवस व मुलांच्या शिक्षणासाठी हजारो क्विंटल तालुक्यामध्ये तूर खाजगी बाजारात कमी दराने विकली गेली आहे. शासनाला तूर खरेदी करायची आहे तर मग वेळेवर खरेदी केंद्र का सुरू करत नाहीत .शेतकर्यांची लूट का होउ देतात असा प्रश्न शेतकरीवर्गात विचारला जात आहे.
Leave a comment