बीड । वार्ताहर
हंगाम 2020-2021 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने बीड जिल्हयात भरड धान्य खरेदी (ज्वारी, बाजरी व मका ) खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मंजूरीने भरड धान्य खरेदीसाठी सहा खरेदी केंद्राना मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ही खरेदी 11 नोव्हेबंर 2020 रेाजी सुरु करण्यात आली होती पण केंद्र शासनाचे उदीष्ट पूर्ण झाल्यामुळे दि. 16 डिसेंबर 2020 रोजी बंद झाल्यामुळे खरेदी पोर्टल बंद करण्यात आले होते. त्यांनतर केंद्र व राज्य शासनाकडून खरेदीस मुदतवाढ देण्यात आली असून बीड जिल्ह्यासाठी मका 17516.10 क्किंटल,बाजरी 29876.00 क्किंटल आणि ज्वारी 29.00 क्विंटलचे उदिष्ट मिळालेले आहे. जिल्ह्यातील सहा संस्थाना उदिष्ट विभागून देण्यात आलेले असून नियमावलीही देण्यात आली आहे. मेसेज पाठवण्यात आलेल्या शेतक-यांची प्राधान्याने खरेदी होईल. खरेदीसाठीचे उदिष्ट निश्चित केल्याने तेवढी खरेदी दि. 31 जानेवारी 2021 पूर्वी करण्यात येणार आहे.
एखाद्या संस्थेची खरेदी कमी झाल्यास त्या संस्थेकडील खरेदी दुस-या संस्थेकडे वर्ग करण्यात येईल. यापूर्वी ऑनलाईन झालेल्या शेतक-यांस उदिष्ट शिल्लक असल्यास मेसेज देऊन खरेदी करिता बोलवण्यात येईल. यापूर्वी ऑनलाईन नोंदणी झालेल्याचाच विचार होईल नव्याने नोंदणी होणार नाही. वाढीव उदिष्ट क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
खरेदी केंद्र बीड - बाजरी 9000.00 क्विंटल,मका 316 क्विंटल, गेवराई - बाजरी 5500.00 क्विंटल,मका 2000.00 क्विंटल,धारुर - बाजरी 200.00 क्विंटल, मका 500.00 क्विंटल, शिरुर - बाजरी 5676 क्विंटल,मका 500.00 क्विंटल ,शिराळा/ कडा - बाजरी 8000.00 क्विंटल, मका 10000.00 क्विंटल,केज - ज्वारी 29.00 क्विंटल,बाजरी 1500.00 क्विंटल, मका 4200.00 क्विंटल, एकूण ज्वारी 29.00 क्विंटल, बाजरी 29876.00 आणि मका 17516. 10 क्विंटल.
Leave a comment