जि.प. शाळेच्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावणे भोवले

अंबाजोगाई । वार्ताहर

तालुक्यातील वरपगाव येथील ग्राम पंचायतच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दोन खोल्या पाडल्यानंतर सरपंचाने निघालेले दगड, गज, खिडक्या आदी साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत एका सदस्याने तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन त्यात दोषी आढळल्याने अपर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सरपंचास अपात्र ठरवून पदावरून काढून टाकले.  
वरपगाव येथील ग्राम पंचायतच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद सालेतील दोन खोल्या जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे खोल्या पाडण्याबाबत ग्राम पंचायतच्या सभेत ठराव घेण्यात आला. जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी डिसेंबर 2018 मध्ये सदरील दोन खोल्या पडण्याची परवानगी दिली. मात्र, सरपंच अंकुश पांडुरंग शिंदे यांनी ग्राम पंचायतीला न कळवता त्या दोन खोल्या पाडून निघालेले चिरेबंदी दगड, पत्रे, फरशी, अंगल साहित्याची परस्पर विक्री केल्याची तक्रार ग्रा. पंचायत सदस्य तानबा बाबुराव लांडगे यांनी केली होती. तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंती त्यांनी शासकीय साहित्य मालमत्तेची विक्री करताना सरपंच अंकुश शिंदे यांनी अनियमितता केल्याचा ठपका ठेवत अहवाल अपर विभागीय आयुक्तांना सादर केला. दोन्ही बाजूचे समजावून घेतल्यानंतर अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सरपंच अंकुश शिंदे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद केले आणि ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1)  अन्वये शिंदे यांना अपात्र ठरवून पदावरून काढून टाकले. तथापि, या निर्णया विरुद्ध 15 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करण्याची मुभा अंकुश शिंदे यांना देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.