आष्टीतील प्रकार: औरंगाबादच्या तिघांवर गुन्हा
आष्टी । वार्ताहर
जमिनी खरेदीचा व्यवहार करुन करुन इसार पावती केल्यानंतर 22 लाख 50 हजार रुपये घेऊन नंतर रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा प्रकार आष्टीतील मुर्शदपूर येथे समोर आला आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि.19) आष्टी ठाण्यात औरंगाबाद येथील तिघांवर गुन्हा नोंद झाला.
पोलीसांच्या माहितीनुसार, पराग पाठक, प्रिया पाठक व सुलोचना धुमाळ (सर्व रा.एन.सिडको,औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. रामदास दत्तात्रय बनसोडे (रा.मुर्शदपूर, ता.आष्टी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी 2013 मध्ये पाठक यांच्याकडून अडीच एकर जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. इसार पावती केल्यानंतर बनसोडे यांनी पाठक यांना आतापर्यंत 22 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. यातील काही रक्कम रोख तर काही पैसे बँक खात्यातून दिले होते. दरम्यान, इसार पावती झाल्यानंतर खरेदीखत करण्यास पाठक यांनी टाळाटाळ सुरु केली. खोटी नोटरी करुन फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन तिघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.हवालदार संतोष क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.
Leave a comment