तीन दिवसानंतरही शिक्षण विभागाकडून दखल नाही
परळी । वार्ताहर
परळीतील श्री सरस्वती विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हे सतत आपल्याशी व कर्मचार्यांशी उद्धट वागतात व नेहमी गैरवर्तन करतात अशी तक्रार बीडचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिक्षक रामकीसन सुरवसे यांनी ही तक्रार केली असून, याच्या प्रति पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शिक्षण मंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. सदरील तक्रारींची दाखल घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी दि.13 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज तिसर्या दिवशीही हे उपोषण सुरू असून दरम्यान काल रात्री उपोषण करते सुरवसे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या उपोषणास अद्यापही वरिष्ठ अधिकार्यांनी भेटही ही दिली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे हे 13 जानेवारीपासून उपोषणास बसले असून काल मध्यरात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या उपोषणास अद्यापही शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष न दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रामकिसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे, शाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचार्यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचार्यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचार्यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचार्यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचेही शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी सांगितले.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment