पाटोदा । आजीज शेख
यावर्षी तालुक्यात बर्या प्रमाणात पाऊस झाला मात्र पाण्याचे नियोजन केले नसल्याने तालुयातील अनेक गावांना सध्या पाणी उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे विविध योजनेतून करोडो रुपये खर्चकरूनही आजही महिलांच्या डोक्याववर हंडा पाहायला मिळत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत गरजा पुरवण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना मंजूर केल्या जातात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना नळयोजना साठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातों मात्र अधिकारी अन पुढारी यांच्या मुळे या योजना दर्जेदार न करता थातूर मातुर केल्या जातात व यामुळे गावातील सर्वसामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावपुढार्यांचे दुर्लक्ष अन अधिकार्यांची उदासीनता या मुळे विविध योजना कागदावर पहावयास मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावांना विविध योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी लाखोचा निधी उपलब्ध होतो. मात्र तालुक्यातील अनेक गांवांना आजही नळ योजनेद्वारे पाणी मिळत नसून गावातील लहान, वृद्धसह महिलाना हंड्याने पाणी भरावे लागत आहे. अशीच परस्थिती जवळपास पाटोदा तालुक्यातील बहुतांश गावात पहावयास मिळत आहे या मुळे अनेक गावातील कुटुंब गाव सोडून वस्तीवर राहणे पसंत करत असल्याचे बोलके चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. तालुक्यातील बहुतांश गावात मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करूनही आज महिलांना डोक्यावर हंडा घेवून पाणी आणावे लागते या कडे कोणाचेच लक्ष नसल्याने हि परास्थिती निर्माण झाली.
दुरुस्त्या कागदावर
तालुक्यातील बहुताश गावात 13 व 14 वित्त आयोगातून पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च दाखवला जातो त्यातील काही बंदही असतात अन केलेला खर्च हि थातूर मातुर करून पैसे कमवण्याचा प्रकार अधिकार्यांना हाताशी धरून पुढारी करतात.
Leave a comment