चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

माजलगाव । वार्ताहर

सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचा वर्धापनदिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महिलांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे,अशी माहिती तुळजाभवानी अर्बनचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, रविवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायं. 4 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चंद्रकांत शेजुळ म्हणाले, या महाआरोग्य शिबिरात महिलांच्या विविध रोगांबाबत तपासणी, मार्गदर्शन, इलाज केला जाईल. सुमारे 5 हजारांवर महिला या शिबिराचा लाभ घेतील असा मानस त्यांनी वक्त केला.या महाआरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजलगाव विकास प्रतिष्ठानच्याअध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके असतील तर शिबिराचे उद्गाटन बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शिवकन्याताई शिवाजीराव सिरसाट करतील. प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समिती सभापती सौ.सोनालीताई भागवतराव खुळे, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने आदींची समावेश आहे. या शिबिराची नोंदणी सुरू झाली असून याचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहनही चंद्रकांत शेजुळ यांनी पत्रकार परिषदेत केले. या शिबिरात येणार्‍या महिलांच्या अल्पोपहाराची सोय तुळजाभवानी अर्बनतर्फे करण्यात आलेली असून शिबिरात कोरोनाबाबतचे शासनाने दिलेले सर्व नियम पाळले जातील अशीही माहिती शेजुळ यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला या पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, अशोक मगर, कृष्णा मोरे यांची उपस्थिती होती. 

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येणार

या मोफत शिबिरात बार्शी येथील कॅन्सरतज्ज्ञ डॉ.नंदकुमार पानसे, डॉ.प्रतिभा मुळे, डॉ.विजया दुलांगे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंजली मुंडे, वंधत्व तज्ज्ञ नंदकुमार मोरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अर्चना मोरे, डॉ.अंजली अकोलकर, डॉ.प्रिती रूद्रवार आदी तज्ज्ञ डॉक्टर्स या शिबिरात तपासणी करून मार्गदर्शन करतील. वंधत्व निवारण, कॅन्सरसह महिलांच्या विविध आजारांवर यावेळी तपासणी आणि उपचार केले जातील. गरजू महिलांना संबंधित आजारांवरील औषधी मोफत दिली जाईल असे आयोजकांनी कळविले आहे. तसेच एच.बी.तपासणी मोफत केली जाईल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.