बीड । वार्ताहर
शहरालगतच्या नामलगाव फाट्यावर उड्डानपुलापुढील दुभाजक हॉटेल व्यावसायिक यांनी औद्योगिक केंद्राचे निमित्त करून अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून शिफारस मिळवून दुभाजक तोडले. शिवाय अनधिकृत रस्ता केला आहे. यामुळे अपघात वाढत आहेत. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी दखल घेतली असून जिल्हाधिकारी बीड यांना संबधित प्रकरणात नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी (भुसं)जा.प्र.बीड यांना कार्यवाही करून अहवाल देण्यास सांगितले आहे.सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी ही माहिती दिली.
बीड तालुक्यातील नामलगाव फाट्यावर उड्डानपुलापुढील दुभाजक हॉटेल व्यावसायिक यांनी कागदोपत्रीच औद्योगिक केंद्र वसाहत दाखवून लोकप्रतिनिधींकडून शिफारस मिळवून स्थानिक अधिकार्यांच्या मदतीने दुभाजक तोडुन अनधिकृत रस्ता केला होता. या प्रकरणी डॉ.ढवळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना जिल्हाधिकारी बीड, विभागीय आयुक्त यांच्यामार्फत लेखी तक्रार केली होती. या प्रकरणाची विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद (पुनर्वसन विभाग) यांनी दखल घेऊन 20 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी बीड यांना डॉ.ढवळे यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई व हॉटेल व्यावसायिक यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984, कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिले आहेत. दम्यान आता यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ.ढवळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान दुभाजक तोडुन अनधिकृत रस्ता केल्यामुळे अपघात प्रवण क्षेत्र वाढले असून त्याठिकाणी दि.8 जून 2020 रोजी तिहेरी अपघात तर दि.5 जानेवारी 2021 रोजी दुहेरी भीषण अपघात झालेला आहे. त्यामुळेच वरील प्रकरणात कारवाई न केल्याबद्दल जिल्साधिकारी बीड व उपजिल्हाधिकारी (भुसंपादन)जा. प्र. बीड यांच्यावर दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अन्यथा दुभाजक खंडित केलेल्या ठिकाणी नामलगाव फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर क्रमांक 52 वर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा डॉ.ढवळे यांनी दिला आहे.
Leave a comment