युवकाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव!

औरंगाबाद पोलीसांनी बीडमध्ये घेतले ताब्यात 

बीड । वार्ताहर

बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी तिच्या खात्यावरील 40 हजार रुपयांची रक्कम एटीएममधून काढण्यास सांगीतल्यानंतर ती रक्कम विड्राल करुन युवकाने ऑनलाइन जुगारात लावली. मात्र तिथे सगळी रक्कम हरल्यानंतर कुटूंबि आपल्याला रागावतील या भावनेने युवकानेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला, परंतु पोलीसांनी केलेल्या सखोल तपासात हा सगळा बनाव उघडा पडला. अखेर औरंगाबाद पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला ताब्यात घेतले अन् सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी , औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात 13 जानेवारी रोजी 25 वर्षीय युवक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी नोंदवली.या तरुणाची पोलिसांनी सगळी माहिती काढली असता त्याने एका एटीएममधून बहिणीच्या लग्नासाठी म्हणून बहिणीच्या बँक खात्यातील 40 हजार रुपये काढले होते असे समोर आले. दरम्यान, अधिक तपासादरम्यानच शुक्रवारी त्या तरुणाने कुटुंबियांना फोन करुन आपले औरंगाबादच्या कॅनॉट परिसरातून एका चारचाकी वाहनातून अपहरण झाले असून आपल्याला मारहाण करुन सर्व पैसे काढून घेतले गेले असल्याचे सांगितले. पुंडलीक नगरच्या पोलिसांनी युवकाने सांगितलेल्या परिसरातील सर्व सीसीटिव्ही तपासले असता अशा प्रकारे कोणत्याही युवकाचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले. दरम्यान, ज्या मोबाईल क्रमांकावरुन त्याने फोन केला होता त्या क्रमांंकाची अधिक माहिती घेतली असता तो बीडच्या वाहतूक शाखेतील एका पोलिस कर्मचार्‍याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी घटनेची माहिती बीड पोलिस, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती यांना दिली. यानंतर त्या युवकाला बीड पोलिसांनी ताब्यात घेत पुंडलीकनगर नगर पोलिसांच्या हवाली केले. 

संबंधित युवकाची पोलीसांनी सखोल चौकशी केली असता त्याने एटीएममधून पैसे काढून त्या तरुणाने ऑनलाइन किंग कॉँग नावाचा जुगार खेळला यात तो 40 हजार रुपये हरला. त्यानंतर कुटुंबियांना काय सांगायचे म्हणून त्याने अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले. दरम्यान, औरंगाबादहून निघून तो युवक पुण्याला पोहचला तिथून तो सोलापूरला आला आणि तिथून बीडला आला, नंतर त्याने 13 ते 14 जानेवारी दरम्यान सतत प्रवास केला. बीडमधून फोन केल्याने तो सापडला अशी माहिती तपासातून समोर आली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.