जिल्हा प्रशासनाला पडला पोटनिवडणुकीचा विसर

आष्टी । वार्ताहर

तालुक्यातील कडा जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांनी राजीनामा देऊन सव्वा वर्ष उलटले तरी या गटाची पोटनिवडणुक अद्याप झाली नाही.जिल्हा निवडणूक प्रशासनाला याचा नेमका कशामुळे विसर पडला असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक.अनेक भावी आमदारांची राजकिय पायाभरणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून होते. जिल्हा परिषद गटातील गावासाठी वेगळा विकास निधी ही मंजूर असतो.त्यातून काही कामे मार्गी लावता येतात.शिवाय विविध गावांचा मिळून एक गट तयार होत असल्याने त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारा सन्मान ही मोठाच असतो.त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य निवडीच्या निवडणूकाही मोठ्या हिरीरीने लढल्या जातात. मात्र कडा गटाचे सदस्य आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून सव्वा वर्ष उलटले तरी येथील पोटनिवडणुका झाल्या नाहीत.आ.बाळासाहेब आजबे कडा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याला आता सव्वा वर्ष उलटले आहे.कोविडमुळे येथील पोटनिवडणूक झाली नसेल असे म्हणावे तर मधल्या काळात पदवीधर मतदार संघ निवडणूक झाली . सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात आहे. शुक्रवारी त्यासाठी मतदान  पार पडले.तथापि जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाला या निवडणुकीचा विसर कशामुळे पडला असेल असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.