जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 842 उमेदवार रिंगणात
निवडणूकीपूर्वी 18 ग्रामपंचायती बिनविरोध
एकही वैध अर्ज नसल्याने 16 जागा राहणार रिक्त!
बीड । सुशील देशमुख
डिसेंबरमध्ये मुदत संपणार्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंतच्या मुदतीत ग्रा.पं.निवडणूकीचे चित्र बदलले. निवडणूकीपूर्वी जिल्ह्यातील 18 ग्रामपंचातीचे
उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता 111 ग्रामपंचायतीची निवडणूक उद्या 15 जानेवारीला होत आहे. महत्वाचे हे की, अर्ज व्यवस्थित न भरता आल्याने म्हणजेच एकही वैध अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त न झाल्याने 16
जागा रिक्त राहिल्या आहेत तर अर्ज मागे घेतल्यानंतर एका जागेसाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र उरल्याने 193 जागेवरील निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 111 ग्रा.पं.साठी 842 उमेदवार रिंगणात असून उद्या
त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीची निवडूक आता खर्या अर्थाने अंतिम टप्प्यात पोहचली आहे. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना आपले अर्ज निवडणुक विभागाकडे सादर
करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. नंतर 30 डिसेंबर अखेर जिल्ह्यात एकूण 3642 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची 31 डिसेंबरला छानणी करण्यात आली होती. यात 36 अर्ज अवैध ठरवण्यात आले होते.
बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींच्या 413 प्रभांगासाठी 3535 उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले होते; मात्र नंतर 4 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर हे चित्रही बदलले. 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने
आता 111 ग्रा.पं.साठी 842 उमेदवार निवडणूकीला सामोरे जात आहेत.उद्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. वास्तविक जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 51 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील 16 जागेवर एकही
वैध अर्ज प्राप्त झाला नाही, त्यामुळे आता या जागा रिक्त राहिल्या आहेत तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर केवळ एकच वैध अर्ज उरल्याने 193 जागा बिनविरोध ठरल्या, त्यामुळे उर्वरित 842 उमेदवारांचे भवितव्य आता
मतदानातून ठरणार आहे.जिल्हा निवडणूक विभागाने ही माहिती दिली.
अठरा ग्रा.पं. पुर्णत: बिनविरोध
जिल्ह्यातील 18 ग्रा.पं.निवडणूकीपूर्वी पुर्णत: बिनविरोध ठरल्या आहेत. यात बीड तालुक्यातील सर्वाधिक 5 ग्रा.पं.चा समावेश आहे. शिवाय गेवराई, माजलगाव, धारुर, परळी व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी 1 तसेच केज व अंबाजोगाई
तालुक्यातील प्रत्येकी 4 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
उद्या मतदान;तहसीलदार ठरवणार मतमोजणी
जिल्ह्यातील ग्रा.पं.निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता उद्या 15 जानेवारीला 111 ग्रामपंचायतीच्या 842 जागेसाठी मतदान होत आहे. उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. तसेच
18 जानेवाीला मतमोजणीचा दिनांक, ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करणार आहेत. दरम्यान 21 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिध्द केली
जाणार आहे.
मतदानादरम्यान पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीच्या 882 जागांसाठी उद्या मतदान होत असून यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून ग्रा.पं.निवडणूकीच्या ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. बंदोबस्ताचे संपूर्ण नियोजन
पोलीस दलाने केले असून मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 14 जानेवारीला पोलीस बंदोबस्ताविषयीची प्रेसनोट प्रसिध्दीला दिली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Leave a comment