धनंजय मुंडेंच्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला
विवाहबाह्य संबंधाला कायद्यान्वये परवानगी नाही
काय होणार आता? मंत्री पदही धोक्यात येणार का?
मुंबई । प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे आता राजकारण चांगलचं रंगू लागलं आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा नाहीतर मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी केली आहे.
तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपावर सविस्तर खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्यानुसार 2003 मध्ये करूण शर्मा नावाच्या महिलेशी त्यांनी परस्पर संबंध ठेवले होते, ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. तर त्यावर भाजपाच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच
समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे, असं भाजपाच्या महिला आघाडीच्या उमा खापरे यांनी सांगितले. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या
सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.
मात्र द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडे यांना लागू होऊ शकत नाही. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. मुस्लीम व्यक्ती 4 विवाह करू शकतात मग हिंदू व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर काय चुकलं? असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेचे
अजय सिंह सेंगर यांनी उपस्थित करत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. राज्यघटना सगळ्यांनाच समान आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. सर्व धर्मांना विवाहाचे वेगवेगळे बंधन असू शकत नाही. फक्त हिंदू धर्मालाच द्विभार्या
प्रतिबंधक कायदा लागू होणार नाही असं सेंगर यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत पहिल्या पत्नीपासून सुख मिळत नसेल तर मुस्लिमांप्रमाणे दुसरं लग्न करू शकतात, मुस्लीम लोक 4-4 विवाह करतात, मग हिंदूने दुसरं लग्न केले तर चुकीचं काय?
असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. पण या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी आरोप करणार्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत आहोत, असा खुलासा केला आहे.
धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक
मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे, ही मुलं माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि
माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे. सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
प्रतिज्ञापत्रात अपत्यांचा उल्लेख नसल्याने अडचणीत येणार?
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ऑक्टोबर 2019 विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची
शक्यता आहे.
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी आणि तीन मुलींचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती या रकान्यात तीन मुलींची नावे दिली
आहेत.
धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंधातून आपल्याला दोन मुलं असल्याचं म्हटलं आहे. पण प्रतिज्ञापत्रात यासंदर्भात माहिती दिसून येत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे याप्रकरणी अडचणी येण्याची शक्यता असल्याचं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
या संदर्भात निवडणूक आयोगाचे काय नियम आहेत? अपत्य असल्याचा आणि त्यांची नावं प्रतिज्ञापत्रात न दिल्यास उमेदवारावर निवडणूक आयोग कारवाई करू शकतं का? या प्रकरणात धनंजय मुंडे यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द होऊ शकतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते?
राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, विवाहबाह्य संबंध असल्यास माहिती निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात देण्याची आवश्यकता नसते. त्यापासून त्यांना अपत्य असले आणि त्यांनी अपत्यांना आपले
नाव दिले असले तरी नियमानुसार प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख नसल्यास कारवाई होऊ शकत नाही असे मला वाटतं.
ते पुढे सांगतात, त्यांची पत्नी आणि मुलांची नावं दिली आहेत. त्यामुळे प्रतिज्ञापत्रात काहीही लपवलं असं म्हणता येणार नाही. याचा निवडणुकीवर किंवा पदावर परिणाम होईल असं वाटत नाही. पण यामुळे प्रतिमा मलिन होऊ शकते.
पण सर्वोच्च न्यायालयातले वकील राकेश राठोड यांना मात्र धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे
धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात विवाहबाह्य संबंधातून झालेल्या अपत्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांची माहिती त्यांनी लपवली आहे. प्रतिज्ञापत्राच्या अखेर मी दिलेली माहिती योग्य असल्याचा दावा
उमेदवारांना करावा लागतो. पण धनंजय मुंडे यांनी ही माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
यासंदर्भात बोलताना वकील असीम सरोदे यांनी सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनुसार, स्त्री-पुरूष संबंधातून जन्माला आलेलं कोणतंही मुल बेकायदेशीर ठरू शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात
देणं गरजेचे होतं.
यासंदर्भात बोलताना वकील असीम सरोदे यांनी सांगितलं, इंडियन ओथ क्ट आणि प्रतिज्ञापत्राच्या कायद्यानुसार दिशाभूल करणारं प्रतिज्ञापत्र गुन्हा ठरू शकतं. यासंदर्भात तक्रार झाल्यास आणि जनतेची आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचं
सिद्ध झाल्यास धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होऊ शकते.
विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे का?
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबंध राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
धनंजय मुंडे यांनी एका महिलेसोबत त्यांचे परस्पर संमतीने संबंध असल्याचं मान्य केलं आहे. त्याचसोबत, कुटुंबियांना याची माहिती असल्याचा ही दावा केला आहे.
सोशल मीडियावर मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधाची चर्चा सुरू आहे. तर राजकीय पक्षांकडून त्यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये ’विवाहबाह्य संबंध हा अपराध होऊ शकत नाही’ असा ऐतिहासिक निर्णय दिला होता.
त्यामुळे भारतात विवाहबाह्य संबंध कायद्याने गुन्हा आहे की नाही? कायदेतज्ज्ञांचं याबाबत काय मत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
विवाहबाह्य संबंध म्हणजे काय?
लग्न झालेल्या पत्नी-पत्नी व्यतिरीक्त परस्त्री किंवा परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास विवाहबाह्य संबंध असं म्हटलं जातं. याला इंग्रजी मध्ये ’अडल्ट्री’ असं म्हणतात.
’अडल्ट्री’ किंवा विवाहबाह्य संबंधाची व्याख्या काय?
इंडियन पिनल कोड आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम 497 मध्ये विवाहबाह्य संबंधांची व्याख्या सांगण्यात आली आहे.
’एखादी महिला दुसर्या पुरुषाची पत्नी आहे किंवा पत्नी असण्याची शक्यता आहे अशा महिलेसोबत तिच्या पतीच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे याला ’अडल्ट्री’ असं म्हटलं जातं. यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, दंड भरावा लागू शकतो
किंवा दोन्ही शिक्षा दोऊ शकतात. अशा गुन्ह्यांमध्ये पत्नीवर (महिलेवर) कारवाई केली जाणार नाही.’
मुंबई हायकोर्टातील वरिष्ठ वकील अमित कारखानीस सांगतात, अडल्ट्री’ कायदा लिंग-तटस्थ (ॠशपवशी छर्शीीींरश्र) नव्हता. कलम 497 मध्ये फक्त पुरुषांबद्दलचा उल्लेख करण्यात आला महिलांबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही.
विवाहबाह्य संबंध, न्यायालय
विवाहबाह्य संबंधांच प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. हा कायदा लिंग-तटस्थ नाही, पुरुषांविरोधात आहे असं याचिकाकर्त्यांनी कोर्टात याचिकेत म्हटलं होतं.
याबाबत वकील राकेश राठोड बीबीसीशी बोलताना सांगतात, विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेचा पती किंवा विवाहबाह्य संबंध असलेल्या पत्नीचा पती अडल्ट्रीचा गुन्हा दाखल करू शकतो.
विवाहबाह्य संबंध कायद्याची माहिती
1. हा कायदा 158 वर्षं जुना आहे
2. खझउ च्या कलम 497 नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे?
सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध अपराध नाही असं म्हटलं तरी यावर मतमतांतरं नक्कीच आहेत.
ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यघटनेनुसार विवाहबाह्य संबंध हा क्रिमिनल ऑफेंस ठरत नाही. हिंदू धर्मानुसार कायद्यात विवाहबाह्य संबंध प्रौढ महिला आणि पुरुषामध्ये
परस्पर सहमतीने असल्यास तो गुन्हा ठरत नाही.
विवाहबाह्य संबंधाच्या कायद्याबाबत बोलताना वकील स्वप्ना कोदे सांगतात, सप्टेंबर 2018 पर्यंत अडल्ट्री भारतीय दंड संहितेच्या कलम 497 अंतर्गत गुन्हा होता. ज्यात एखाद्या पुरूषाने विविहित स्त्रीसोबत संबंध ठेवले, तर
त्या महिलेच्या पतीला पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार होता.
विवाहबाह्य संबंध घटस्फोटाचं कारण असू शकतात?
2018 मध्ये विवाहबाह्य संबंधावर निर्णय देताना कोर्ट म्हणालं होतं, ’विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने घटस्फोट घेता येऊ शकतो,’
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि वकील अमित कारखानीस म्हणतात, विवाहबाह्य संबंध क्रिमिनिल ऑफेंस होता. आता यात अटक करता येत नाही. पण, अडल्ट्रीचा आधार घेत कोर्टात घटस्फोटाची केस दाखल करता येऊ शकते. कोर्टात हा एक चांगला ग्राउंड
असू शकतो.
तर, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात, विवाहबाह्य संबंध असल्यास या आधारावर पती किंवा पत्नी घटस्फोट मागू शकते.
भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपला मान्यता आहे?
महिला-परुष परस्पर सहमतीने एकत्र रहाणं, त्यांच्यात प्रेम असणं, शारीरिक संबंध असणं किंवा भविष्यात लग्न करण्याचा विचार करून एकत्र रहाणं याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात. कायद्यात लिव्ह-इन रिलेशनशिपची काही व्याख्या
सांगण्यात आलेली नाही. लिव्ह-इन म्हणजे दोन व्यक्ती आपल्या मर्जीने एकत्र रहाणं. कायद्याच्या कोणत्याही पुस्तकात याला मान्यता देण्यात आलेली नाही. कोर्ट म्हणतं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये मुलं जन्माला आली तर त्या मुलांना बेकायदेशीर
म्हणता येणार नाही. कारण यात मुलांचा काहीच दोष नसतो. सुप्रीम कोर्टाने एका आदेशात विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलांना आई-वडीलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो असं सांगितलं आहे.
विवाहबाह्य संबंध कोणत्या देशात गुन्हा आहेत?
अमेरिकेतील 21 राज्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा आहेत. शरीया आणि इस्लामिक कायद्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा मानले जातात. इराण, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि सोमालियामध्ये हे गुन्हा मानले जातात.
तैवानमध्ये विवाहबाह्य संबंधाबाबत एक वर्षाची शिक्षा सुनावली जाते. इंडोनेशियातही अडल्ट्री गुन्हा मानला जातो. यूकेमध्ये विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानलं जात नाही. घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी हे एक कारण मात्र असू शकतं.
धनंजय मुंडेंच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार?
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, असं
किरीट सोमय्या म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं की, एखादी तक्रार आल्यानंतर पोलीस निश्चितपणे चौकशी करतील. पण जी महिला आरोप करतेय, तिच्या बहिणीशी धनंजय मुंडे
यांचं लग्न झालंय, त्यांची दोन मुलं आहेत. त्यांचं नावही मुलांना दिलंय. आता त्यांची बहीण पुढे आलीय. पण पोलीस निश्चितपणे चौकशी करतील. हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यामुळे धनंजय मुंडेच यावर बोलू शकतात, असं मलिक पुढे
म्हणाले.
भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केल्यानं आता हे प्रकरण राजकीय वर्तुळात पोहोचलंय. त्यामुळे याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका धनंजय मुंडेंच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादीला बसू शकतो का, हे आम्ही राजकीय विषयांच्या
जाणकारांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक न्यायमंत्र्यावरच असे आरोप होत असतील, तर काही ठीक नाही. आरोपांची चौकशी व्हायलाच हवी. जे खातं त्यांच्याकडे आहे, त्या खात्याद्वारे अशा प्रकरणांमध्ये खरंतर न्याय देण्याची भूमिका असते. अशावेळी याच खात्याचा मंत्री वादाच्या
भोवर्यात अडकत असेल, तर चिंता वाटण्याची गोष्ट आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, भाजप या प्रकरणाचा फायदा घेत टीका करेल, यात शंका नाही. त्यामुळे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांना चौकशीची ग्वाही द्यावी लागेल. धनंजय मुंडे यांना बाजूला व्हावं लागेल,भाजपकडून किंवा विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला
जाऊ शकतो. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो.
धनंजय मुंडेंनी राजीमाना द्यावा-चंद्रकांत पाटील
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्यावतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यापुढेही ती लावून धरली जाईल. यात भाजपचे प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील. ज्या
व्यक्तीचे विरोधात आरोप होतात त्या व्यक्तीने पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. पण गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री व सरकार याबाबत आत्मपरीक्षण करतील किंवा राजीनामा देतील असे वाटत नाही. तरीही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा
तातडीने द्यावा अशी आमची मागणी राहणार आहे.’
याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी भाजपच्या वतीने आम्ही राज्यभर उठाव करणार असल्याचे सांगितले.
Leave a comment