तब्बल 9 महिन्यांनंतर सुरु ... होणार  खासगी क्लासेस
 

बीड । वार्ताहर

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शाळा-महाविद्यालयांबरोबरच कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले होते. अद्यापही शासनाने कोचिंग क्लासेससंदर्भात निर्णय घेतलेला नाही. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीची परवनागी देवून येत्या दोन दिवसात कोचिंग क्लासेस सुरु होण्याची शक्यता आहे, मात्र बीडमध्ये कायदा धाब्यावर बसवून बहुसंख्य कोचिंग क्लासेस सुरु आहेत. याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. गेल्याच आठवड्यात एका कोचिंग क्लासमधील शिक्षकच पॉझिटिव्ह निघाल्याने चार दिवस हा कोचिंग क्लास बंद करण्यात आला होता, मात्र आता हा क्लास पुन्हा सुरु करण्यात आला आहे.


मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा-महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी,वैद्यकीय महाविद्यालये तातडीने बंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर दहावी आणि बारावीची एक-एक विषयाची परिक्षाही रद्द करण्यात आली होती. अद्यापही शाळा-महाविद्यालये बंद असल्यागतच आहेत. 9 वी ते 12 वी या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के उपस्थितीवर परवानगी देवून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय मंत्री यांनी 20 जानेवारीनंतर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. पुण्यामध्ये काही महाविद्यालयांनी जुलै महिन्यात परीक्षा घेतल्या, त्यात अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले

होते. शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 72 शिक्षक बाधित निष्पन्न झाले होते. हा धोका लक्षात घेवून खासगी कोचिंग क्लासेसला प्रशासनाने अद्याप स्पष्टपणाने परवानगी दिलेली नाही असे असतानाही बीड शहरातील सहयोगनगर, आदर्शनगर, डीपी रोड, धोंडिपूरा, माने कॉम्पलेक्स आदी ठिकाणी राजरोस आणि जोरदार क्लासेस सुरु आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने का डोळेझाक केली असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पालकांनीही कोरोनाचा धोका लक्षात घेवून कोचिंग क्लासेसला पाल्यांना पाठवताना विचार करण्याची गरज आहे.

तब्बल 9 महिन्यांनंतर सुरु होणार पुण्यातील खासगी क्लासेस

कोरोनामुळे बंद असलेले  शहरातील खासगी क्लास सुरु करण्याची परवानगी 

 

कोरोनामुळे बंद असलेले पुणे शहरातील खासगी क्लास सुरु करण्याची परवानगी पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल ९ महिन्यांनंतर खासगी क्लासेस उघडणार आहेत.

पुणे महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी, थर्मल गन, ऑक्सिमीटर, सोशल

डिस्टन्सिंग हे बंधनकारक असणार आहे. 

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर खासगी क्लासेस देखील बंद होते. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर

हळूहळू अनलॉकला सुरुवात झाली. अनेक गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आली. काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली गेली. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शाळा सुरु होती. पण क्लासेस मात्र

अडचणीत आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.