मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अखेर विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये आयोजित परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 7 सप्टेंबर 2020 च्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा प्रस्तावित होती. पण सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. यासोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षाही पुढे ढकलल्याचं प्रसिद्धीपत्रक 13 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलं होतं.
MPSC चे सुधारीत वेळापत्रक जारी; अशा आहेत तीन परीक्षांच्या तारखा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय दिनांक ७ सप्टेंबर, ० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर, २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. तथापि, सदर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासनाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर, २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. या परिक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर, २०२० रोजी नियोजित सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर, २०२० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा पुढे नण्याबाबत दिनांक १३ ऑक्टोबर, २०२० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले. २. सन २०२० मधील आयोजित उपरोक्त ३ परीक्षा पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर
खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास नियोजित करण्यात येत आहेत :
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a comment