महादेव महाराज चाकरवाडीकर जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती
बीड । वार्ताहर
बीड तालुका दूध संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केशर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रोडूसर कंपनीच्या वतीने केज याठिकाणी दूध संकलन व शीतकरण केंद्राचे भव्य उद्घाटन होणार आहे ह.भ.प महादेव महाराज चाकरवाडी कर यांच्या हस्ते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी सकाळी 11 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड तालुका दूध संघाच्या वतीने केशर आणि मिल्क प्रॉडक्ट सुरू करण्यात आलेल्या आहेत दूध संघाच्या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस आता वाढू लागली आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणीदेखील या उत्पादनाला चांगली पसंती आणि मागणी येत आहे यामुळे संघाच्या अंतर्गत असणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना मोठा फायदा होऊ लागला आहे. केज तालुक्यातील अनेक दूध शेतकर्यांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना दूध संकलन केंद्र उघडण्याबाबत मागणी केली होती शेतकर्यांची गरज लक्षात घेता 10 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता महादेव महाराज चाकरवाडी कर यांच्या शुभहस्ते जुना पिसेगाव रस्ता उद्धव स्वामी यांच्या समाधीस्थळाचे जवळ केज येथे या केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यास केज तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान केशर मिल्क व मिल्क प्रॉडक्ट प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष नानासाहेब काकडे आणि बीड तालुका दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे यांनी केले आहे.
Leave a comment