बीड । वार्ताहर
जनावरांच्या गोठ्यामध्ये विज प्रवाह उतरल्याने एका तरुणाचा र्शाक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.8) आहेर वडगाव येथे घडली. या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, अशोक राजेंद्र कदम (33,रा.आहेरवडगाव) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी गोठ्यावरील पत्र्यावर ठेवलेली पेंड काढत असताना या तरुणाला विजेचा शॉक लागल्याने सदरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून सविस्तर जवाब ग्रामीण पोलीसांना दिला जाणार आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment