बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेले मनोरंजन क्षेत्र पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या सेवेत सुरू होत असून संतोषीमाता इ स्क्वेअर चित्रपट गृहाचीद्वारे आजपासून (दि.9) खुली होत आहे .बीड शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या संतोषीमाता चित्रपट गृहामुळे बिडवासीयांची सांस्कृतिक आणि मनोरंजनाची भूक भागत होती.मात्र कोरोनाचे संकट आल्यानंतर मार्च महिन्यापासून सर्वच चित्रपटगृह,नाट्यगृह बंद करण्यात आले होते.गेल्या दहा महिन्यात रसिकांना देखील नव्या चित्रपटांचा आस्वाद घेता आला नाही.दरम्यान आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्यामुळे सिनेमगृह सुरू झाली आहेत.
राज्य आणि केंद्र सरकारने मागील दोन महिना अगोदरच या क्षेत्राला सर्व नियम पाळून सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी दिली होती.त्यानुसार 9 जानेवारी पासून शहरातील संतोषीमाता इ स्क्वेअर हे चित्रपट गृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची सेवा दिली जाणार आहे.कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्क शिवाय चित्रपट गृहात एन्ट्री मिळणार नाही,हॅन्डवोश,सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल,तसेच दोन रसिकांच्या मध्ये सोशल डिस्टन्स राहावे म्हणून काळजी घेतली जाणार आहे.दहा महिन्यापासून बिडवासीय ज्या मनोरंजनाला मुकले होते ती सेवा आता सुरू होत आहे, त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संतोषीमाता इ-स्क्वेअर व्यवस्थापनाने केले आहे.
Leave a comment