बीड । वार्ताहर

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्याविरोधात गुरुवार बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. भडकलेल्या गित्ते समर्थकांनी जमावबंदीचे नियम तोडून गर्दी गित्ते यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. जमावबंदीचे नियम तोडून गर्दी जमविल्याचा आरोपाखाली गुरुवारी रात्री बबन गित्ते यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली.
उर्मिला गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी गित्ते यांच्या कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. जमाव बंदीचे आदेश झुगारुन गर्दी केल्यामुळे गित्ते यांच्यावर कारवाई चा बडगा उगारण्यात आला होता.यावेळी पोलीस आणि गित्ते यांच्यात बचाबाची झाली. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतल्यावर दोन रिव्हॉल्वर तसंच जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे आढळून आली होती. आरोपी बबन गित्ते याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.परळी पंचायत समिती सभापती म्हणून उर्मिला  गित्ते या काम पाहत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला. यामुळे गित्ते समर्थक चांगलेच भडकलेले होते. चिडलेल्या गित्ते समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करायला सुरुवात केली. अखेर जमावबंदीचे नियम तोडून गर्दी केल्याप्रकरणी बबन गित्ते यांना परळी पोलिसांनी अटक केली आहे.

परळीत मुंडे विरुध्द मुंडे, लेटर वॉरचा भडका

गित्ते विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राज्यभरात सुरु होती. कारण, भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं गुरुवारी सांगण्यात आलं. पण, ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय. तसं प्रसिद्धी पत्रकच भाजपनं जारी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.