जिल्ह्यात 44 नवे रुग्ण तर 24 कोरोनामुक्त
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात नव्या वर्षाच्या प्रारंभी केवळ 17 रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे आज शनिवारी (दि.2) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी 44 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत तर 24 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात शनिवारी 538 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 494 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर 44 नवे रुग्ण निष्पन्न झाले. बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक 16, अंबाजोगाई तालुक्यात 3, बीड 8, गेवराई 2, माजलगाव 5, परळी 8 य पाटोदा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 16 हजार 844 इतकी झाली असून यापैकी 16 हजार 55 जणांनी कोरोनावर मात केली असून 533 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 81 हजार 130 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यातील 1 लाख 64 हजार 286 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Leave a comment