बीड । वार्ताहर
येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या 17 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आजपासून दि.2 जानेवारी ते 6 जानेवारी 2021 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘तुका आकाशा एवढा’ या कथामालेचे आयोजन करण्यात आले आहे. रामायणाचार्य, वाणीभूषण समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून विचाररुपी पुष्प गुंफले जाणार आहेत. कीर्तन महोत्सवात प्रथमच ही कथामाला आयोजीत केली गेली आहे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान आयोजीत 17 वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव यंदा कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात साध्या पध्दतीने संपन्न होत आहे. बीड शहराच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक परंपरेत भर टाकणार्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला बीडकर रसिक श्रोत्यांनी सुरुवातीपासूनच भरभरून प्रेम दिले आहे. यंदाच्या महोत्सवात आज दि.2 ते 6 जानेवारी या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून जगद्गुरु, संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘तुका आकाशा एवढा’ या कथामालेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात येवून ही कथा श्रवण करता येणार आहे. भाविकांनी या सहा दिवसीय कथेचा तसेच दररोज संपन्न होणार्या सांप्रदायिक कीर्तन सेवा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन गौतम खटोड, सुशील खटोड व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
Leave a comment