-भाजपाच्या पगारपट्टावरच असल्याचा किशोर तिवारी यांची शंका 

ज्या सनदी अधिकाऱ्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे ज्यांना कायद्याची सर्व तरदुती व आपल्या प्रशासकीय जबाबदारीची संपुर्ण जाणीव असल्याचे प्रमाणपत्र अनेकदा मिळाले आहे असे अधिकारी आपला कणा गमावून बसल्याचे त्यांचा वर्तनात वारंवार दिसत असुन प्रत्येकवेळी भाजपाला मुद्दा मिळेल वा महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणणे वा सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी वा मंत्र्यांनी केलेल्या घोषणा व सरकारच्या निर्णयांची अंबलबजावणी करतांना प्रशासकीय नियमांची व कायद्यातील अटींची पूर्तता न करता सरकार जनतेचे अहित पहात असे चित्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या चौकडीच्या इशाऱ्यावर करीत असल्याची गंभीर शंका लोकप्रशासन कायदा सामाजिक न्याय व राज्यशात्र या विषयावर उच्चं शिक्षा घेतल्यावर मागील ३० वर्षांपासून सार्वचनिक जीवनातील राजनेत्यांचा भ्रष्टाचार व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या तलाठी ग्रामसेवक पासुन मंत्रालय व सरकार नियुक्त सर्व आयोगावर त्यामधील सहभाग यावर लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 
सध्या कणा नसणाऱ्या हो जी मायबाप करणाऱ्या व लाळचाटूपणा करून आपल्या पदावर असतांना कोट्यवधींची संपत्ती जमा करून नंतर निवृत्तीनंतर पगारासह बंगला सर्व सुखसुविधा मिळवत प्राधिकरण नियंत्रण मंडळ आयोग यावर जबरीने पदावर असतांना काळेबेरे करून त्याचा दबावाच्या मदतीने मिळविण्याची प्रथा रूढ झाली आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नेत्यासारखंच मरेपर्यंत सरकारी सुख सुविधा सोडणार नाही अशीच शपध घेतल्याचे चित्र निर्माण झाले जर हे सनदी अधिकारी निवृत्तीनंतर एखाद्या खाजगी कंपनीमध्ये चौकीदार वा  चपराशीसाठीही कोणीही नियुक्त  करणार नाही मात्र यामुळे प्रामाणिक सार्वचनिक जीवनातील  भ्रष्टाचाऱ्याचा विरोध  व प्रशासनातील सुचिता ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात विषाद निर्माण झाला आहे कारण कोणतेही सरकार आले तरी हे लाळचाटू सनदी अधिकारी हो ला हो करीत मुख्यमंत्र्यांची मर्जी कोणत्या जादूने संपादीत करतात त्यांचे दलाल सालार कोणतेही असो तसेच सक्रिय असतात याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 

किशोर तिवारी हे मागील ६ वर्षांपासून शेतकरी मिशनचे अध्यक्ष म्हणून सरकारमध्ये आहेत व मागील ३० वर्षापासुन त्यांचे दिल्लीत व मुंबईत खालून वर पर्यंत जवळचे संबंध आहेत त्यांनी अनेक प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी अनेकवेळा लढा दिला आहे मात्र आता आपणास लाळचाटूपणाचा कळस व  हो ला हो करीत चुकीचे राजकीय निर्णया उणीवा  दूर न करता विरोधी पक्षांच्या व न्यायालयाच्या हातात कोलीत देणाऱ्या कणा विकलेले विचारहीन अधिकारी  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या चौकडीच्या इशाऱ्यावर तर हे काम करीत नाहीना असा सवाल आज समाज विचारत  असल्याची खंत किशोर तिवारी यावेळी व्यक्त केली आहे . 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या चौकडीच्याने सत्तेत असतांना याच अधिकाऱ्यांच्या मदतीने व लोकायुक्त कार्यालयाचा दुपयोग करून आपल्याच पक्षाच्या व शिवसेनेच्या मंत्र्यांना व नेत्यांना किरीट सोमय्या ,संजय निरुपम ,अंजली दमानिया ,गिरोडिया यांच्यासारख्या पोटभरू जेथे खातात त्याच थाळीला भोक करणाऱ्या काडीबाज बेईमान नेत्यांना सोबत घेऊन प्रयोग केले होते तेच प्रयोग आजही सुरु असल्याने आपणास ही शंका येत असल्याचे किशोर तिवारी यांनी म्ह्ट्ले आहे .

अनेक निवृत्त सनदी अधिकारी आजही लोकलाज विकुन सरकारी बंगले अनेक वर्षांपासून खाली करीत नसुन आता तर अशा नीती सोडलेल्या अविचारी  निवृत व निवृत्तीच्या दारावर आलेले या सनदी अधिकाऱ्यांची एक मोठी टोळी अस्तित्वात आली आहे व हे सरकारला कसे अडचणीत आणावे यासाठी सुपारी घेऊन काम करीत असल्याची चर्चा बाहेर येत असल्याचा दावा यावेळी किशोर तिवारी यांनी केला आहे मात्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना हेवेदाव्याचे राजकारण वा मुळात आजचे तत्वहीन राजकारण समजत नसल्याने या काडीबाज टोळीचा नायनाट कोण करणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.