नगराध्यक्ष स्वतःची टिमकी वाजवण्यात मदमस्त
माजलगाव | वार्ताहर
माजलगाव चे नगराध्यक्ष शेख मंजूर हे पारदर्शक कारभाराची टिमकी वाजवत असून न प चा पारदर्शक कारभार हा रोजंदारी शिपायांच्या हाती गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.17 डिसेंबर रोजी न प ने काढलेल्या आदेशाप्रमाणे रोजदारी शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नामांतर,गुंठेवारी व मालमत्ता कर वसुलीचा प्रमुख पदाचा पदभार सोपवला आहे.
आ प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष शेख मंजूर यांचा हा पारदर्शक कारभाराचा उत्कृष्ट नमुना राज्यपातळीवर बक्षीस देण्यायोग्य असल्याची चर्चा माजलगाव शहरात आहे.
इतर तृतीय श्रेणी व संवर्गातील कर्मचारी असताना सदरील हंगामी व चतुर्थ श्रेणी रोजंदारी कर्मचाऱ्याकडे शहरातील महत्वाचा कारभार देण्यामागे नगराध्यक्ष शेख मंजूर याचा नेमका उद्देश काय यामागील गौडबंगाल काय हे जनतेला आ प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट करावे?अशी मागणी जोर धरत आहे.पूर्वीच्या काळातील स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी तसेच भूखंड विषयक करोडो चे प्रकरणात काळे कागद पांढरे करण्यासाठी तर हा खटाटोप नाही न अशी चर्चा शहरात आहे.माजलगाव न प मध्ये 70 कायमस्वरूपी कर्मचारी असताना रोजदारी कर्मचाऱ्यांना हे काम सोपवले गेल्यामुळे राष्ट्रवादीच्या कारभरविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जिल्हाधिकारी साहेब हे काय चाललंय?
माजलगाव न प मध्ये 40 च्या आसपास कायमस्वरूपी तृतीय श्रेणी कर्मचारी असताना रोजदारी वर असणाऱ्या व शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरातील नामांतर,गुंठेवारीव मालमता कर वसुलीचा एवढा मोठा कारभार कसा काय दिला जात आहे.याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.image widget
Leave a comment